नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात‘ या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागाता आपाल नवा मानस जाहीर केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा हा दुसरा भाग होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासाठी मानस या विशेष मोहिमेचा उल्लेख केला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व वयोगटातील भारतीयांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढाईत एक मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी, ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपला मुलगा अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, असे प्रत्येक कुटुंबाला वाटत असते. आता अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने ‘मानस’ नावाचे एक खास केंद्र सुरू केले आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठे पाऊल आहे. मानस हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे.
