रमेश औताडे

 

 

मुंबई : पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य विम्याचे कवच देण्यासाठी नगरसेविका आशाताई मराठे यांनी पत्रकार आरोग्य विमा अर्ज भरून त्यासाठी लागणारे शुल्क त्यांनी स्वतः भरले. कोरोना काळातही यांनी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न सरकारी योजनेच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले.
कोरोणा काळात काही पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. काही पत्रकार मृत पावले. त्यावेळीही त्यांना किराणा सामान व आरोग्य मदत त्यांनी दिली होती. आजही अनेक पत्रकार आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना येत आहेत. पत्रकार कल्याणकारी योजना असावी यासाठी सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे. असे आशाताई मराठे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई उपनगर परिसरातील सर्व पत्रकारांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिबिर आयोजन करून यावेळी अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी लागणारे अर्ज शुल्क आशाताई मराठे यांनी भरले असून तीन दिवसानंतर या योजनेचे स्मार्ट कार्ड पत्रकारांना मिळणार आहे. भाजपा मंडळ महामंत्री गुरुदास पै, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. चेतना कोरगावकर, सावित्रीबाई फुले घरेलु कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मराठे, देविदास वर्मा, पुष्पराज माने, उपनगर पत्रकार असोसिएशन चे सहसचिव समीर कर्णूक, उपाध्यक्ष संध्या श्रीवास्तव, पत्रकार आनंद श्रीवास्तव आदी पत्रकार उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *