मुंबई : बुजुर्ग छत्रपती पुरस्कार प्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर, माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी इंदूर, मध्यप्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर विभागात घवघवीत यश संपादन केले. त्यांनी मास्टर्स विभागात तिसऱ्या गटात सलग चार सुवर्ण पदके मिळवण्याचा पुन्हा पराक्रम केला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पाताडे यांना “सेकंड स्ट्रॉंग मॅन” या किताबाने गौरविण्यात आले. चार दशकांपेक्षा जास्त काळ पाताडे या खेळात असून त्यांनी देशविदेशातील विविध स्पर्धांत खोऱ्याने पदके आतापर्यंत जिंकली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण गेले काही महिने कसून तयारी केली होती. त्याचेच फळ मला पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत या चार सुवर्ण पदकांच्या रुपाने मिळाल्याची प्रतिक्रिया पाताडे यांनी दिली. युवा खेळाडूंना आज देखील मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याचे पाताडे सरांचे कार्य सुरुच आहे.
00000
