संदीप चव्हाण
पॅरिस- पॅरिसची परी भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला. ऑलिम्पिकमध्य महिलांच्या १० मीटर पिस्तुल नेमबाजीत भाकरने भारताला पहिले वहीले एतिहासिक गोल्ड मेडल जिंकून दिले. अवघ्या ०.०१ इतक्या फरकाने तीचे सिल्वह मेडल जिंकले. पण ब्राँझ मेडल जिंकत तिने भारतीय महीला नेमाबाजांना आत्मविश्वास मिळवून दिला. आजवर अभिनव बिंद्राच्या गोल्ड मेडलसह भारताने यापर्वी जिंकलेली शुटींगमधिल चारही मेडल ही पुरूष खेळाडूंनी जिंकली होती. पुरुषांची ही मक्तेदारी आज भाकरने मोडून काढली.
भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुण मिळवून कांस्यपदक जिंकले आहे. यापुर्वी बिजींग ऑलिम्पिकमध्य अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल जिंकले होते. तर अथेन्समध्य राज्यवर्धन सिंग राठोडने तर लंडनमध्ये विजय कुमारने सिल्व्हर आणि गगन नारंगने ब्राँझमेडल जिंकले होते.
यापूर्वी मनू भाकरने 97, 97, 98, 96, 96 आणि 96 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने हंगेरीच्या वेरोनिका मेजर आणि दक्षिण कोरियाच्या ओह येजिन यांच्या मागे तिसरे स्थान पटकावले. या सामन्यात भारताचा दुसरी नेमबाज रिदम सांगवान 573-14 गुणांसह 15व्या स्थानावर राहिला. ती फायनलला मुकली.
मनू भाकर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत बाद झाली होती. ते शल्य आज तीने मेडल जिंकत दूर केले.यापुर्वी भाकरने 2017 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक (रौप्य पदक) जिंकले. यानंतर, केरळमध्ये 2017 च्या राष्ट्रीय खेळांमध्ये तीने चमकदार कामगिरी केली. तिने नऊ सुवर्णपदके जिंकून हीना सिद्धूचा विक्रम मोडला.
मेक्सिकोच्या ग्वाडालजारा येथे 2018 आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) विश्वचषक स्पर्धेत भाकरने दोन सुवर्णपदके जिंकली होती. वयाच्या 16 व्या वर्षी विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरली. यानंतर तिने 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातही सुवर्णपदक जिंकले होते.
मनू भाकरने 2018 ISSF विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि 2018 युवा ऑलिंपिक खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तीने 25 मीटर पिस्तूल प्रकारात विक्रमी धावसंख्या केली.
