पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑलिम्पिक मध्ये एतिहासिक कामगिरी करणाऱ्या मनू भाकरचे फोनवरून अभिनंदन केले. करोडो भारतीयांची मान तू आज उंचावली आहेत. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा अशा शब्दात तीला मोदींनी शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर ऑलिम्पिकमध्ये कशाची कमतरता तर नाही ना अशी आपुलकीने विचारपूसही केली. भारतीय महीलांना एक आदर्श तू घालून दिला आहे. तुझी कामगिरी दिवसागणिक उंचावत जावो अशा शब्दात मोदींनी मनू भाकरला शुभेच्छा दिल्या.
