मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी शैला मधुकर लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा बुधवार 31 जुलै संध्याकाळी सहा वाजता, सावतामाळी भुवन हॉल, भायखळा स्टेशन पूर्व समोर, मुंबई येथे होणार आहे. शैला लोखंडे यांनी महापालिकेची छत्तीस वर्षे सेवा केली असून अनेक नागरिकांची त्यांनी प्राधान्याने काम केली आहेत. तसेच ई विभागाच्या सामाजिक, पूजा आणि शैक्षणिक कमिटीवर देखील त्यांनी काम केले आहे.त्या एक दीव्यांग असून त्यांच्या प्रशासकीय सेवेमधील अनेक अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तरी आपण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन सत्कार सोहळ्याचे आयोजक देविदास लोखंडे यांनी केले.
0000
