राजीव चंदने
मुरबाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व्हेसर्वा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मुरबाडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेत केक कापून तसेच मुलांना फळे व मिष्ठांन्नाचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. मुलांशी हितगुज करत, संवाद साधत सामाजिक जाणिवेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पक्षाचे मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव, विधानसभा क्षेत्र संघटक भरत गायकर, तालुका समन्वयक विनायक ढमणे, शहर प्रमुख संदीप बहाडकर, तालुका सचिव नरेंद्र (भाऊ) यशवंतराव, सहसंपर्क प्रमुख नरेश देसले, युवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश चौधरी, युवासेना सचिव मिलिंद घरत आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत कायकर्ते उपस्थित होते.
00000
