प्रकाश आंबडेकरांची टीका
लातूर : फडणवीसांचा आरक्षण वाढवण्याचे वक्तव्य हा जावईशोध असून एससी एसटी आरक्षण वाढ कोणाच्या बापाच्या हातात नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
दरम्यान भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्याशी अचानक भेट झाल्याचे सांगत आम्ही ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील पत्र हे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांना दिली आहेत असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर लातूरमध्ये होते. आज ते लातूरवरुन बीडकडे निघाले होते. त्याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली
नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं, जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला तुमचं समर्थन आहे की विरोध. विरोध असेल तर विरोध म्हणून सांगा. समर्थन असेल तर समर्थन आहे म्हणून सांगा, पण फाटे कशाला फोडता ? असा सवाल आंबेडकर यांनी केलाय.आम्ही पहिल्यापासून मागणी करत आहोत ओबीसींचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असावे. यात वेगळं काही नाही. आमच्या भूमिकेत बदल नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
