महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षेबाबत
ठाणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वागळे इस्टेट, ठाणे येथे ‘ महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा’ या विषयावर ठाणे पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वागळे इस्टेट, ठाणे येथे ‘ महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा’ या विषयावर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्रीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे गुलझारीलाल फडतरे व पोलीस उपनिरीक्षक रेश्मा कदम यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार करपे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेच्या प्राचार्या स्मिता माने यांच्यासह सर्व गट निदेशक, निदेशक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी एम.के सरवदे यांनी केले.
