Month: July 2024

सर्वेश जावळेचा वाढदिवस कायम स्मरणात राहील असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा

मुंबई : अंध मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबन साठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या NATIONAL ASSOCIATION FOR THE BLIND (NAB) ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आपल्या देशातील अनेक पुरस्कार प्राप्त…

 कळंब पोश्री नदीपुलाला भगदाडामुळे वाहतुकीस धोकादायक

ताबडतोब उपाययोजना करा – विनोद भोईर     नेरळ : कळंब पोशिर नदीपुलावर मोठे भगदाड पडल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी प्रतिक्रिया विनोद भोईर ( ग्रामस्थ वारे) यांनी दिली आहे. तर कर्जत मुरबाड महामार्गावर असलेल्या पोशीर नदी पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे,त्यात सततच्या पावसाने पुलाला मोठे भगदाड पडून पुलाच्या एक बाजूचा आतील भराव वाहून गेला आहे,पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिली तर अवजड वाहनाच्या भाराने पुलाचा कळंब कडील भाग पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो प्रशासनाने ताबडतोब यावर उपाययोजना करावी, अशी प्रतिक्रिया दीपक म्हसे ( ग्रामस्थ खैरपाडा-कळंब) यांनी दिली आहे. कर्जत मुरबाड महामार्गावरील कळंब येथील पोश्री नदी पुलावर अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो ,भगदाड पडलेल्या भागात बेरिकेट लावण्यात आली असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.मात्र सततधार पावसाने तसेच अवजड वाहनाच्या भारामुळे पुलाचा एकभाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मागील आठवड्या भरापासून सततधार कोसळणाऱ्या पावसात तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे,त्यातच ठाणे आणी रायगड जिल्ह्याला जोडणारा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या कर्जत मुरबाड हायवे वरील कळंब येथील पोशीर नदीपुलावर कळंब कडील भागात मातीचा भराव खचल्याने पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे, शनिवारी सायंकाळी एका वाहन धारकास रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या असल्याचे दिसले तसेच पुलाच्या एका बाजूचा मातीचा भराव वाहून मोठा भगदाड पडला असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना या बाबत कळवले असता पोलिसांनी खचलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरता स्वरूपात बॅरिकेट्स लावल्या असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, सुमारे ७० ते ८० वर्ष जुनं बांधकाम असलेल्या व दगडी पिलरवर उभारलेल्या पुलाची यापूर्वी अनेक वेळा डागडुजी करण्यात आली आहे मात्र जुनं बांधकाम असल्याने पूल जीर्ण होत चालले आहे ,पुलाच स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळला असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत ,वृक्ष- वेळीच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसागणिक कमकुवत होत आहे,त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून यापुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थ,वाहनधारक करत आहे.

कुलगुरू प्रा. डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवी भारत सरकारकडून जाहीर

२९ जुलै रोजी पदग्रहण सोहळा अशोक गायकवाड     रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी संरक्षण मंत्रालय भारत सरकार कडून जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा, सोमवार दि.२९ जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे. ही पदवी विशिष्ट सेवा पदक मिळवलेले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य,विद्या परिषदचे सदस्य तसेच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून १९ विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, फार्मसी ,वास्तुशास्त्र ,हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी चे सुमारे ३४० महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. विद्यापीठ परिवाराकडून संलग्नित महाविद्यालयाकडून तसेच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 00000

देश उभारणीतील खाजगी क्षेत्राचा अत्यल्प सहभाग चिंताजनक

मुंबई : आर्थिक सुधारणांना प्रारंभ होऊन पावशतकापेक्षा अधिक काळ उलटला. याकाळातील सर्व सरकारांकडून भरघोस सवलती, सोईसुविधा घेऊन प्रचंड नफा कमाविणार्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी देश उभारणीच्या कार्यात दिलेले अत्यल्प योगदान निराशाजनकच…

 लघुवाद न्यायालयात ३२ प्रकरणे निकाली

 राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद     मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा अशी मिळून एकूण २५४ पैकी ३२ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर, अतिरिक्त मुुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम व श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. न्यायाधीश एस. एन. गोडबोले, ए. जे. फटाले, वकील उषा गुप्ता, उज्वला घोडेस्वार यांनी लोकअदालतीचे काम पाहिले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक आर. के. हजारे, आर. के. कुळकर्णी आणि कर्मचारी वृंद यांनी केले. ०००००

मुंब्य्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीची निवेदनाद्वारे मागणी       मुंब्रा : शहरातील तमाम आंबेडकरी जनतेची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी मुंब्रा-कौसा कमिटीची अनेक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मुंब्रा शहरामध्ये उभारावा अशी मागणी होती, त्यासाठी सदर कमिटीतर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदनातर्फे मागणी करण्यात आली असून लवकरच पुतळा उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही निवेदन देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनाही निवेदन देण्यात आले आहे. अशी माहीती मुंब्य्रातील युवा नेतृत्त्व बुद्धभूषण गोटे यांनी दिली. निवेदन देण्यासाठी समाजसेवक भुजंग साळवी, संतोष भालेराव, अनिता साळवी, जितू अडांगळे, दीपक साळवी, मयूर कांबळे, धीरेंद्र मिश्रा, श्री. सिंग, कुणाल निकाळे, शनिदास कांबळे, किरण गोटे आदी उपस्थित होते. 00000

 ‘खारफुटी पर्यावरणशील संवर्धन दिन’ साजरा

ऐरोली खाडीकिनारा स्वच्छ करत लोकसहभागातून   नवी मुंबई : युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजी जगभरात ‘खारफुटीच्या पर्यावरणशील संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ऐरोली सेक्टर 10 येथील खाडीकिनारी विद्यार्थी व नागरिकांच्या सहयोगातून खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाकरिता खाडीकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून माझी वसुंधरा अभियानाचेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विस्तृत असा खाडीकिनारा लाभला असून त्याची स्वच्छता रहावी व त्याचा उपयोग खाडीकिना-यांच्या पर्यावरण संरक्षणाला व्हावा या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून ऐरोलीचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक अहिरे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतिश सनदी व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून या विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह वनशक्ती स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख श्री.विकी पाटील व त्यांचे सहकारी तसेच घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या खाडीकिना-याच्या विशेष स्वच्छता मोहीमेत 60 गोणी प्लास्टिक बाटल्या, प्रतिबंधात्मक प्लास्टिक, चपला तसेच तत्सम कचरा गोळा करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे खारफुटी जतन व संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यात आले. ००००

शहापूर तालुक्यातील धबधबे बंद

खर्डी : चार ते पाच वर्षांपासून शहापूर तालुक्यातील धबधब्याच्या पाण्यात ठिकठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या वर्षी खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील धबधब्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना…

जुन्या पेन्शनसाठी दंडवत आंदोलन

पालघर : राज्यातील सरकारी-निमसरकारी अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा, या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी काल भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर दंडवत आंदोलन केले. ‘एकच मिशन-जुनी…

मोखाड्यातील १७ गावपाडे दरडीच्या सावटाखाली

मोखाडा, ता. २८ : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दरी डोंगरात वसलेल्या मोखाडा तालुक्यात १७ गावपाडे डोंगराच्या पायथ्याशी व माथ्यावर…