Month: July 2024

दहीहंडी उत्सवाची राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख होण्यासाठी ‘प्रो गोविंदा सीझन’ – पुर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर     ठाणे : दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रो गोविंदा सीझन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते, अशा भावना प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळामधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते असे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले. प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी २० लीग चेअरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियावाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील स्व. बाबुराव जिम्नॅस्टिक सेंटर येथेप्रो गोविंदा सीझन २  ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी, राज्यभरातील ३२ संघांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. श्री आगरेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मरीआई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदु एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलदेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी शनिवारी, २७ जुलै व उर्वरित १६ संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी, २८ जुलै रोजी संपन्न झाली. या फेरीतून अंतिम फेरीसाठी १६ संघ निवडण्यात आले. अंतिम फेरी १८ ऑगस्टला वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली. ००००

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुरारोग्यासाठी बोरीवली येथे आदिशक्ती महायज्ञ

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे उद्धवजी ठाकरे यांच्या उत्तम, निरोगी…

नवी मुंबईत विविध विभागांत एकाच वेळी आठ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई : महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नो‍टीस देऊनही संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ     मुंबई दि. 28. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी  शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या 11 सदस्यांनी शपथ घेतली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 00000

रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद -पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अशोक गायकवाड     अलिबाग : रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.महिला बालविकास विभाग, रायगड अंतर्गत बालकल्याण समिती व पोलिस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण सन्मान सोहळा व ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बेलत होते. यावेळी कोकण मार्गदर्शक ऍडव्होकेट सीमा अदाते, बाल कल्याण समिती सदस्य डॉ गाणार, ऍड श्रीमती झेमसे,जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन जयवंत गायकवाड, कॅलिडा रिहॅबचे डॉ. प्रशांत, डॉ. संतोष पवार, डॉ. अक्षय पाटील उपस्थित होते. या वेळी बालकांच्या क्षेत्रात कायद्याला अनुसरून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन पोलीस अधीक्षक घार्गे व बालकल्याण समिती चे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे व सदस्य यांचे हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालकांच्या प्रति काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करून बालकांप्रती काम करण्यासाठी प्रेरणा ऊर्जा उत्साह निर्माण करणे. बालकांची जास्तीत जास्त काळजी व संरक्षणाची जबाबदारी घेऊन बालकांचे पुनर्वसन करणे तसेच तनावाचे व्यवस्थापन करणे. यासाठी कॅलिडा रिहॅब सेंटर व भूमिका फाउंडेशन चे मोठे योगदान व मार्गदर्शन मिळाले. याबाबत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक करून बालकल्याण समितीला धन्यवाद दिले.या कार्यक्रमात बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड (कर्जत), राजेंद्र मायने (महाड), निवृत्ती बोराडे (माणगाव), श्रीमती प्राची पांगे, श्रीमती माधुरी घाडगे, श्रीमती वर्षा पाटील तर नवी मुंबईचे सुनील होलार, अभिजीत मोरे, दत्तात्रय पवार, संतोष पिलाने, श्रीमती प्रणिता भाकरे, श्रीमती सारिका बोराटे, रेल्वे पोलीस आदी उकृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल धुळे यांचा निरोप समारंभ करून उपस्थित संस्थेच्या व संपर्क बालग्रामचे विनायक पाटील,संपर्क बाल ग्रामचे खंदारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे जि.प. जयवंत गायकवाड ,डॉ विशाल गाणार, ऍड आधाते ऍड झेमसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 00000

पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरसावल्या नगरसेविका

रमेश औताडे     मुंबई : पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य विम्याचे कवच देण्यासाठी नगरसेविका आशाताई मराठे यांनी पत्रकार आरोग्य विमा अर्ज भरून त्यासाठी लागणारे शुल्क त्यांनी स्वतः भरले. कोरोना काळातही यांनी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न सरकारी योजनेच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. कोरोणा काळात काही पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. काही पत्रकार मृत पावले. त्यावेळीही त्यांना किराणा सामान व आरोग्य मदत त्यांनी दिली होती. आजही अनेक पत्रकार आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना येत आहेत. पत्रकार कल्याणकारी योजना असावी यासाठी सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे. असे आशाताई मराठे यांनी यावेळी सांगितले. मुंबई उपनगर परिसरातील सर्व पत्रकारांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिबिर आयोजन करून यावेळी अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी लागणारे अर्ज शुल्क आशाताई मराठे यांनी भरले असून तीन दिवसानंतर या योजनेचे स्मार्ट कार्ड पत्रकारांना मिळणार आहे. भाजपा मंडळ महामंत्री गुरुदास पै, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. चेतना कोरगावकर, सावित्रीबाई फुले घरेलु कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मराठे, देविदास वर्मा, पुष्पराज माने, उपनगर पत्रकार असोसिएशन चे सहसचिव समीर कर्णूक, उपाध्यक्ष संध्या श्रीवास्तव, पत्रकार आनंद श्रीवास्तव आदी पत्रकार उपस्थित होते. 00000

रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. इंडियनऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बी एस ई -इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँक  यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले होते. या कार्यक्रमात पार्ल्यातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीत आयोन एक्सचेंज लिमिटेड चे समूह सीएफओ नंदकुमार रणदिवे, ब्ल्यू क्रॉस लि.चे एमडी भालचंद्र बर्वे, सीए सुनील मोने , बँकर नागेश पिंगे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, माजी उपमहापौर अरुण देव, उद्योजक राजू रावल, विद्यानिधी शिक्षण संस्थेच्या प्रा.संगीता तिवारी यांचा समावेश होता.…

बुजुर्ग पॉवरलिफ्टर सतीश पाताडे यांचे यश

मुंबई : बुजुर्ग छत्रपती पुरस्कार प्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर, माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी इंदूर, मध्यप्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर विभागात घवघवीत यश संपादन केले.…

पायथागोरस, रुसो आणि ऑलिम्पिक…

संदीप चव्हाण   मिशन ऑलिम्पिक पॅरिसच्या मातीची बातच न्यारी आहे. जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुताचा मंत्र देणारी हीच ती भुमी. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने अवघ्या जगाला ‘मानवी हक्कांचा जाहिरनामा’ मिळाला. त्यातील…