Month: July 2024

लक्षभेदी सामाजिक संस्थेने काढली आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी

ठाणे : ठाण्यातील लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या वतीने पाचपाखाडी भागातून आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी काढण्यात आली . लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव माधुरी मेटांगे यांच्या…

उल्हासनगर महापालिकेत अभय योजना आणि लोकअदालतीचे आयोजन

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत २२ जुलै ते २६ जुलै रोजी मालमत्ता कर वरील शंभर टक्के दंड माफ करण्यासाठी अभय योजना तसेच  २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले असून जास्तीत…

 कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामावर रिपाइं आक्रमक

आंदोलनाचा इशारा राजीव चंदने     मुरबाड : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या संथरित्या सुरू असलेल्या चौपदरीकरण कामामुळे ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या दयनीय अवस्थेला प्रवाशांसह सामान्य नागरिक देखील हैराण झाले असून याविरोधात रिपाइं सेक्युलर पक्षाने विविध मागण्यांचे पत्र दिले आहे. महामार्ग खोदून ठेऊन दोन्ही बाजूने केवळ गटाराची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाने प्रवास करावा लागतो. खाजगी चारचाकी – दुचाकी धारकांना रात्री अपरात्री प्रवास करताना पावसात रस्त्यावरील भरावाचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत ज्या अंतरापर्यंत रस्ता उखडून ठेवला आहे, त्या गावापर्यंत रस्ता पूर्ण केल्याशिवाय पुढील रस्ता खोदून ठेवू नये, आज पर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघाताची जबाबदारी संबंधीत ठेकेदारानी घेऊन अपघात पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, मुरबाड तालुक्याच्या हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला दिल्या शिवाय काम सुरू करू नये, मुरबाड शहरालगत रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायीकांना दिवाळी पर्यंत उठवू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरी नेते श्यामदादा गायकवाड यांच्या रिपाई सेक्युलर पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते देण्यात आले असून याप्रकरणी गांभीर्यपूर्वक निर्णय न घेतल्यास ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. तर प्रवासी व चालक यांच्या व्यथा महामार्ग प्रशासनाच्या दरबारी मांडण्यात आल्याने पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 00000

मिरा भाईंदर महापालिकेच्या उपायुक्तांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचे उपायुक्त रवी पवार यांची बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात अनोळख्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी…

 जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून

 उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात   उल्हासनगर –  शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेला मुहूर्त मिळाला आहे. उल्हासनगरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविली. या योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रत्येक घराला नवीन ब्ल्यू पाईपचे नळजोडणी देणे, पाणी मीटर बसविणे, पाणी वितरणासाठी ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारणे, पंपिंग स्टेशन आदींचा समावेश होता. मात्र या योजनेतून काही भाग सुटल्याने, दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजनेचे काम सुरू आले. मात्र अवघ्या १३ कि.मी. क्षेत्रफळाच्या शहरात पहिल्या टप्प्याची ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी टंचाई, पाणी गळती, अनियमित पाणी पुरवठा आदी समस्या कायम आहे. कॅम्प नं-३ हिराघाट परिसर, शिरू चौक, सुभाष टेकडी परिसर, गायकवाड पाडा, गोलमैदान येथील राहुलनगर परिसर, शांतीनगर येथील डॉल्फिन हॉटेल परिसर, कॅम्प नं-४ येथील महादेवनगर, संतोषनगर, भीम कॉलनी, मद्रासीपाडा आदी विविध भागात प्रत्येकाच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून लांब पाईप टाकून नळजोडणी घेण्यात आल्या आहेत. गटारी, सांडपाण्याच्या नाल्यातून जाणाऱ्या या पाईपलाईनला गळती लागली असून अश्या गळक्या पाईप मधून नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अश्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधींच्या योजना कोणासाठी नागरिकांना स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी महापालिका केंद्राच्या अमृत योजने खाली कोट्यवधींचा पाणी पुरवठा वितरण योजना राबविते. मात्र त्याचा फायदा नागरिकांना होत नसल्याने, ह्या योजना कोणासाठी राबवितात. असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मसाला बाजारात राडारोडा टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार

नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज लाखोंच्या घरात मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे निर्माण…

कल्याण रिंग रोड पूर्णत्वाकडे

प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण     ठाणे: डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या एकूण आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण, डोंबिवली सह आसपासच्या शहरातील वाहतूक जलदगतीने करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

शिवसेना शहप्रमुखाकडून आमदाराला कुंभकर्णाची उपमा

पाणी, वीज समस्येवरून विद्यमान आमदारांना अप्रत्यक्ष टोला     अंबरनाथः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना शहरातील विविध समस्यांवरून स्वपक्षियांच्याच टिकेला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपू्र्वी अंबरनाथच्या पाणी प्रश्नावरून आणि आता विजेच्या समस्येवरून अंबरनाथ शिवसेनेचे माजी शहप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नाव न घेता १५ वर्षांच्या कुंभकर्णाला आम्ही जागा केला अशी आमदार किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अंबरनाथ शहरावर गेल्या काही वर्षात शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. येथील नगर पालिका, आमदार आणि खासदारही शिवसेनेचे आहेत. शिवसेनेतील दुफळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच वर्चस्व शहरात पहायला मिळाले. मात्र शहरात गेल्या काही वर्षांपासून दोन गट उघडपणे एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या दोन आठवड्यात या कुरघोड्यांचे अनेक अंक पाहायला मिळाले. काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात पाणी आणि वीजेच्या समस्येने डोके वर काढले होते. त्यावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा दिला होता. त्यानंतर प्राधिकरणाने वीज समस्येमुळे पाणी समस्या वाढल्याचे सांगितल्याने वाळेकरांनी महावितरणाकडे मोर्चा वळवला. त्यानंतर संयुक्त बैठकीनंत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावर काही अंशी दिलासा मिळाला. त्यामुळे याचे श्रेय घेण्यासाठी वाळेकर यांनी शिवसेनेच्या वकीने फलकबाजी केली. त्याच वेळी नगरविकास विभागाने अमृत योजनेतून अंबरनाथसाठी पाणी योजना जाहीर केली. त्याची फलकबाजी आमदार डॉ. किणीकर यांनी केली. शहराच्या पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर एकाच पक्षाच्या या दोन गटाचे बॅनर झळकले होते. दोन्हींवर शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. त्यामुळे पक्षातच दुफळी असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले. याप्रकरणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नेमकी टीका काय ? काही जणांना आपण केल्यानंतर जाग येते. ती येणे गरजेचे आहे. लोकांना जागी करणे शिवसेना शहर शाखेचे काम आहे. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. इथे काही लोक पंधरा वर्ष झोपलेले होते. त्यांना शिवसैनिकांनी जागे केले. जाग आलेल्या त्या कुंभकर्णाचे आभार मानतो, अशी टीका वाळेकर यांनी मंगळवारी केली. त्यापूर्वी पाणी प्रश्नावर बोलताना, पाणी वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी चिखलोलीचे पाणी मिळवले. मात्र पाच वर्ष धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. गाळ काढला, खर्च केला मात्र उंची काही वाढली नाही. उंची वाढवणे आणि लोकांना सुविधा देण्यासाठी सुरूवातीला स्वतच्या विचारांची उंची वाढवाली लागेल, असा टोला आमदार डॉ. किणीकर यांना लगावला होता.

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेकरिता कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येणा-या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दि. 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने ज्या…

एजीस लॉजिस्टिकचे किरण तरे यांना युनियनच्या प्रयत्नाने तीन लाख रुपयांची मदत

मुंबई : एजीस लॉजिस्टिकचे किरण तरे यांना युनियनच्या प्रयत्नाने तीन लाख रुपयांची मदत करण्यात आली. मुंबईमधील माहुल येथील एजीस लॉजिस्टिक ही एक नामवंत मल्टीनेशनल कंपनी असून,  माहुल येथील काम करणाऱ्या कामगारांचे सेवाशर्ती व पगारवाढ इत्यादीचे प्रश्न  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचेअध्यक्ष  ॲड. एस. के.  शेट्ये यांच्या  मार्गदर्शनाखाली विद्याधर राणे आणि विकास नलावडे हे पाहतात. किरण तरे हे गेली अडीच  वर्षे आजारीअसल्याने कामावर येत नव्हते. कंपनीचे उपाध्यक्ष श्री. गिरीश गुरखे, जनरल मॅनेजर प्रवीण जांगडे यांच्यासोबत युनियन पदाधीकाऱ्यांची बोलणी होऊन किरण तरे याना त्यांच्या गैरहजर कालावधीचा पंगार त्यांच्या रजेमध्ये एडजस्ट करून त्यांचा ऐच्छिक सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला. या व्यतिरिक्त  त्याना तीन लाख रुपये विशेष अर्थसहाय्य देण्यात आले. ॲड. एस. के. शेट्ये आणि विद्याधर राणे यांच्या विनंतीला  गिरीश गुरखे , प्रविण जांगडे  यांनी सहानुभूतीपूर्वक व  सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीमधील युनियनचे प्रतिनिधी जयेश तावडे, एम . एच. साखरे, डी. एल. बोराडे व इतर कामगार प्रतिनिधीनी यासाठी यूनियनपर्यंत श्री. तरे यांचे प्रतिनिधित्व केले. याबाबत श्री. तरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 0000