Month: July 2024

दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविणार – पालकमंत्री उदय सामंत

अशोक गायकवाड     अलिबाग : राज्यात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबविणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले. रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी १५६ ई-शॉप वाहनांचे वाटप करण्यात येत आहे. या वाहनांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगळवारी (ता.१६) पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे १५ लाभार्थ्यांना ई-शॉप वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसात घरपोच वाहन पोहचविले जाणार आहे. राज्यात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबविणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांना रोजगार करता यावा यासाठी ई-शॉप वाहन ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव ७१, मागासवर्गीय बचतगट २८, महिला बचतगट ५७ लाभार्थ्यांना ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत व‌ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते १५ लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करून करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, समाजकल्याण अधिकारी श्यामराव कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणस्नेही ई-शॉप वाहन सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे आहे. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिजाइन करण्यात आले आहे. फिरत्या वाहनावरील दुकानामुळे दिव्यांग बांधव, बचतगटांना रोजगार प्राप्त होणार आहे. *चौकट* सर्व विभागांचा ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या निधीतून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी ई-शॉप वाहन देण्याचे निश्चित केले. याचबरोबर महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. ही योजना यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. *-डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड*

१ कोटी बांबू रोपांची नर्सरी तयार करा – किशन जावळे

  अशोक गायकवाड   रायगड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड योजनेचा लाभ घेऊन शेती पूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करावी, असे…

 भिवंडीत उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक

     मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष     भिवंडी : शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेताना खुल्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे.…

महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

    ठाणे : सीपी तलाव येथील ठेकेदारकडे कार्यरत असलेल्या सुमारे ५५ कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी…

 डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई

    फेरीवाल्यांच्या ठेले, मंचकाची तोडफोड       डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ आणि ग प्रभागाने सोमवारपासून संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत वर्दळीच्या…

 ठाण्यात उंची मार्गरोधक कोसळला

    मार्गरोधक अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी     ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील आराधना सिनेमागृह परिसरातील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या उंची मार्गरोधकास एका ट्रकने धडक दिल्याने तो खाली कोसळल्याचा…

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शिकाऊ उमेदवारांना निवड पत्र वाटप

    ठाणे : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत 15 जुलै रोजी शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेल्या प्रशिक्षणार्थ्यींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

रस्ते दुरुस्ती कामाची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

    ठाणे : पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ…

‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात स्वच्छता दिंडीसह सखोल स्वच्छता मोहीमा

    नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यास नवी मुंबई महानगरपालिकेने आघाडी घेतली असून यामध्ये लोकसहभाग घेताना त्यातही विदयार्थ्यांच्या सहभागावर विशेष भर दिला…