Month: July 2024

शिखर बँक घोटाळ्यात दिलेली क्लीनचीट हाच मोठा घोटाळा

संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान देण्यात आले आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखर…

कोकणात मुसळधार पाऊस

रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट रत्नागिरी : मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू…

मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना

पंढरपुरात मुख्यालय, 50 कोटींची तरतूद मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर  कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिकारीची व्सवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य सरकारकडून याबाबत आज अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “आषाढी वारी” म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. “वारी” ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मार्गस्थ होत असतात. संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर), संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे), संत रुकमाबाई (कौंडण्यपूर- अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती), संत गोरखनाथ (शिराळा), या दिंडींबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.

फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात

मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात दबाव आणत आहेत. फडणवीस आणि छगन भुजबळ हे आरक्षणाच्या विरोधात आहेत असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.…

दैव बलवत्तर; ट्रम्प वाचले

० भर सभेत ट्रम्पयांच्या हत्येचा प्रयत्न ० डोनाल्ड ट्रम्पयांच्यावर गोळीबार ० गोळी कानाला चाटून गेली ० हल्लेखोर ठार; ओळख पटली ० हल्यात ट्रम्पयांचा १ समर्थक ठार   न्यु यॉर्क : केवळ दैव…

काँग्रेसच्या गद्दारांचा १९ जुलैला फैसला

स्वाती घोसाळकर मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणूकीतील मतदानावेळी पक्षाचा आदेश जुगारून गद्दारी करणाऱ्या क्राँग्रेसच्या ८ आमदांचा फैसला येत्या १९ जुलैला होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या यादिवशी होणार…

डोंबिवलीतील आजदेपाड्यात तलवारी घेऊन तरुणांची दहशत

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील आजदेपाडा भागात शनिवारी मध्यरात्री तीन तरुण तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याचा प्रकार समाज माध्यमातील चित्रफितीमधून उघडकीला आला आहे. आजदेपाडा भागातील काही घरांसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या…

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा-पी. वेलरासू

अशोक गायकवाड     नवी मुंबई :राज्यातील महिलांच्या बळकटीकरणासाठी संपूर्ण राज्यभरात लागू केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची कोकण विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक ग्रामंपचायतीच्या माध्यमातून या…

मुंबई युथ काँग्रेसची नवमतदार नोंदणी मोहिम कुलाब्यातून सुरु

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ९९ जागा जिंकत लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळवित विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला हरवीत सत्ता मिळवू असा संकल्प…

फेज तीन मधील रिंग रोडच्या कामास मिळणार गती!

एमएमआरडीएचे अधिकारी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत तिसऱ्या टप्प्यातील रिंग रोडच्या कामाची केली पाहणी!       कल्याण : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार MMRDA चे अधिकारी यांनी महापालिकेचे भूसंपादन…