Month: July 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या…

गणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार- आदिती तटकरे

मुंबई : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन     मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, नाना पटोले, दीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुंबई शहरातील प्रकल्पबाधितांना घरे देण्याबाबत शासन सकारात्मक-उदय सामंत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध नागरी विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्याकडून सदनिका, अनिवासी गाळ्यांची मागणी वाढत आहे. मुंबई शहरात 2017 पासून 4870 प्रकल्पबाधितांना घरे…

पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलैपासून सुरू

 जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023     ठाणे : जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परिक्षा केंद्राची निवड केलेल्या  आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परिक्षा 18 जुलै ते 30 जुलै पर्यंत होणार आहेत. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परिक्षे संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 40%, 19 व 24 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), 25,29 व 30 जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे. विशेष सुचना ज्या महिला उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना / त्यांचे विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल. अन्यथा महिला उमेदवारांना परिक्षेसाठी बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 000000

 उल्हासनगर मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कारवाई

उल्हासनगर शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात सुनिल इंगळे       उल्हासनगर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिक बनवणाऱ्या कारखाने आणि त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर उल्हासनगर मनपा प्रशासन, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाने  धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. प्लास्टिकमुळे ठिकठिकाणी नाले तुंबलेले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे दिसून येत आहे . उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्मिती केली जात असून त्याची विक्रीही खुलेआमपणे केली जात आहे या संदर्भात शहरातील अनेक सामाजिक संघटनांच्या मनपा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उल्हासनगर मनपा आयुक्त अजीज  शेख, आयुक्त यांच्या मार्गदर्शखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस,  उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, तसेच प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख  व प्रदूषण मंडळाचे अधिकारी सीमा दळवी व राजेश नदगावकर यांच्या सयुक्त विद्यमानाने  उल्हासनगर शहरात कॅम्प नं. 02 व कॅम्प नं. 03 मधील पेलूमल कंपाऊंड येथील एकल प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेऊन मंगळवारी अचानक पणे धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सदर कंपन्यांचा 365 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून  10,000 रु. दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.  प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदार व अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध  5000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे. पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक  पिशव्या अडकून तुंबण्याच्या घटना शहरात होत आहेत या संदर्भात मनपा आयुक्त अजीज शेख आयुक्त यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन  पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुषगाने  स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्या अस्वच्छता करणाऱ्या  251 व्यक्तींविरुद्ध 98, 550/- व  एकल प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्री करणाऱ्या विक्रीते विरुद्ध  55000  हजार रु. व 502 kg जप्ती 10 व्यक्तींविरुद्ध एकूण 1,48,550 /- रु. दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे . शहरातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, नाले यांची विषेश सफाई व स्वच्छता करुन नागरीकांना स्वच्छतेबाबत संदेश देवुन जनजागृती केली जात आहे. नागरीकांना शिस्त लागावी या करीता अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरीकांना सूचना/नोटीसा  देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या आशा नागरिकांविरुद्ध ही कार्यवाही सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांनी दिली आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. ०००००

चेंबूर जिमखान्याच्या वतीने राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई: चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन २० ते २२ जुलै २०२४ दरम्यान चेंबूर जिमखाना, चेंबूर ( पश्चिम ), मुंबई – ७१…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरान : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ माथेरान मधील समस्त महिला वर्गाला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतला असून ह्या महत्वपूर्ण कार्यास येथे सोमवार दि.७ पासून…

 ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र

दिवसभरात 256 किलो प्लॅस्टिक जप्त; एकूण 1 लाख 27 हजारांचा दंड वसूल         ठाणे : ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 293 आस्थापनांना भेटी देवून 256 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण 1 लाख 27 हजार 100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 32 आस्थापनांना भेटी देवून 04 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 6 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत 30 आस्थापनांना भेटी देवून 11 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 13 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमितीअंतर्गत 23 आस्थापनांना भेटी देवून 50 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करुन एकूण 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 35 आस्थापनांना भेटी देवून 30 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 57 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत 25 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 14 हजार. इतका दंड वसूल करण्यात आला. वागळे इस्टेट व लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 68 आस्थापनांना भेटी देवून 20 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 8 हजार 100 रु. इतका दंड वसूल करण्यात आला.   वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत एकूण 35 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करुन एकूण 9 हजार 500 रु दंड वसूल करण्यात आला. माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देवून एकूण 125 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 41 हजार 500 रु. इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई दरम्यान प्रभागसमितीस्तरावरील उपमुख्यस्वच्छता यांच्यासह प्रभागसमितीतील कर्मचारी व सफाई कामगार उपस्थित होते.  सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबतची कारवाई नियमितपणे शहरात सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

छायाचित्र स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे : आयुक्‌त सौरभ राव

 जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ‘ठाणे महापालिका चषक 2024’   ठाणे : ‘ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका…