Month: July 2024

सेवानिवृत व दिवंगत पोलिसांच्या घरांसाठी आंदोलन

रमेश औताडे     मुंबई : सेवेत असतानाही त्रास व सेवानिवृत्ती नंतर तर जास्त त्रास सरकारकडून होत आहे. वेळोवेळी सरकार आश्वासन देते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे आम्ही आता आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. असा इशारा सेवानिवृत्त पोलिसांच्या कुटुंबीयांनी आझाद मैदानात दिला आहे. वरळी येथील पोलीस बी. डी. डी. चाळ क्रमांक ६४ ते ७४ व ७७ मधील सेवानिवृत व दिवंगत यांना सेवा ज्येष्ठते नुसार पहिल्या टप्प्यामध्ये घरे मिळावीत अशी मागणी करत करत सरकारच्या फसव्या घोषणा व आश्वासनांचा तीव्र प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत असे ठरले होते की,  वरळी बी. डी. डी. चाळी मध्ये राहत असलेल्या पोलीस रहिवाशांना ज्येष्ठ सेवा निवृत्त व दिवंगत यांना सेवाज्येष्ठतेनुसार पहिल्या टप्यामध्ये घरे देऊ. म्हाडाला याबाबत सर्व माहिती व आदेश दिले असताना अद्यापही काहीच हालचाल झाली नाही. म्हणून नाईलाजास्तव आझाद मैदान येथे उपोषण व आंदोलन करण्यास बसावे लागत आहे असे आंदोलनकर्ते सांगत होते. आता तरी सरकारने  सहानभूतीपूर्वक विचार करून लॉटरी व करार त्वरित सुरू करावेत व उर्वरीत पोलीस रहिवाशांच्या दुसऱ्या टप्याकरिता लॉटरी काढून एकाच वेळी करारनामे करण्यास सुरूवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हरियाणा राज्याप्रमाणे कंत्राटदार विरहीत रोजगार द्या

 वीज कंत्राटी कामगार आझाद मैदानात रमेश औताडे       मुंबई : वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दती प्रमाणे  कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न शासन, प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, आम्ही कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलन करित आहोत मात्र अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही दखल घेतली नसल्याने आझाद मैदानात आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारने जर याप्रकरणी गांभीर्याने दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला  आहे. विधीमंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला.रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवले आहे. फक्त कायम  कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे. या अगोदर आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केली होती. तेव्हाही सरकारला व वीज कंपनीला जाग आली नाही,  त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करत आहे असे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले. वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा , कायम कामगारांच्या प्रमाणे वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना जीवन वेतन प्रणाली प्रमाणे सन्मानजनक वेतनवाढ करावी, दोषी कंत्राटदार ब्लँक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी, आकसाने आणि सुडबुध्दीने नोकरी पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी सचिन मेंगाळे यांनी यावेळी केली. 00000

मुख्यमंत्री असणाऱ्या भावाकडे आपल्या मागण्या घेऊन आलेल्या आझाद मैदानातील बहिणींची भर पावसात झालेली अवस्था

नवीन ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात येणार अधिक पारदर्शकता- सर्जेराव सोनवणे

अशोक गायकवाड     रायगड : महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४२ रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.* राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन २०१७ मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत. या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई-केवायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ, प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण, ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण ) व मोबाईल सीडींग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच ज्या सदस्यांचे ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण)व मोबाईल सीडीग अद्याप झालेले नाही, अशा सदस्यांना नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांत सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा. 00000

बेचिराख गाझात शांतता कधी ?

बरोबर २७७ दिवसांपूर्वी इस्त्रायलने हम्मास बंडखोरांचा उच्छाद कायमचा संपवण्याचा विडा उचलला आणि गाझा पट्टीवर प्रचंड बाँबहल्ले् केले आणि नंतर तिथे थेट रणगाडेही घुसवून आक्रमण सुरु केले. गाझा पट्टीतील शहरे, गावे,…

कॅलिडोस्कोप किस्से, बायकोची अजबगजब अट!

जग झपाट्याने बदलत आहे. आता पती-पत्नी दोघेही काम करत आहेत आणि आपले जीवन आरामात जगत आहेत; परंतु कधीकधी असेदेखील घडते की, पती पत्नीवर दबाव आणू लागतात. बायका नोकरी सोडतात आणि…

लोकसंख्या शिक्षण काळाची गरज

आज ११ जुलै आजचा दिवस जगभर जागतिक लोकसंख्या दीन म्हणून साजरा केला जातो. ११ जुलै १९८७ रोजी जगात पाच अब्जावे बालक जन्माला आले तेंव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून…

खरा अंकुश कोणाचा?

खास बात डॉ. भालचंद्र कानगो लोकशाही असणाऱ्या सर्व देशांमध्ये लोकहितासाठी लोकांचा शासनावर अंकुश असणे अपेक्षित असते. मात्र सध्याची देशातीलच नव्हे तर जागतिक स्थिती बघता निवडणुकीच्या माध्यमातून हे साधणे शक्य होते…

नवी मुंबईत प्रेमांश फाऊंडेशनतर्फे ट्रक चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

नवी मुंबई : प्रेमांश फाउंडेशनने ‘सुश्रुत 2.0’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रक ड्रायव्हर्सच्या अपूर्ण आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. अॅमेझॉन आणि डोकऑनलाइन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश हा आहे की या दुर्लक्षित समुदायाला आरोग्य आणि कल्याणाच्या दृष्टीने मदत करणे. मुंबईत या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून 350 ट्रक ड्रायव्हर्सच्या एकात्मिक आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5 जुलै ते 10 जुलै 2024 दरम्यान पाच दिवसीय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये ट्रक ड्रायव्हर्ससाठी सुमारे 75 चाचण्यांची तपासणी केली जात आहे. या व्यतिरिक्त, कार्यक्रम अंतर्गत ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 60 हून अधिक डॉक्टरांशी कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी मोफत आणि अमर्यादित टेली-आरोग्य सल्लामसलत देण्यात येत आहे. या सेवांच्या माध्यमातून, ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपत्कालीन स्थितीत आरोग्य तज्ञांशी संपर्क साधता येतो आणि एक वर्षासाठी अमर्यादित सल्लामसलत मिळते. प्रेमांश फाउंडेशनच्या संस्थापक आणि सीईओ डॉ. शिखा शुक्ला यांनी सांगितले की, “ट्रक ड्रायव्हर्सच्या कामाच्या स्वरूपामुळे आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे.” त्यांनी अॅमेझॉनचे आभार मानले कारण त्यांच्या मदतीमुळे या ट्रक ड्रायव्हर्सना आता त्यांच्या प्रवासातच डॉक्टरांशी संपर्क साधता येईल. या एकात्मिक आरोग्य कार्यक्रमाचा लाभ एकूण 1400 ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत, बेंगळुरू, मानेसर आणि आता मुंबई येथे या कार्यक्रमाचा लाभ 5000 हून अधिक ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.