Month: July 2024

जनावरांना साथीच्या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी मुरबाडमध्ये शिबिराचे आयोजन

राजीव चंदने मुरबाड : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे अंतर्गत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,संलग्न यशोदिप  सामाजिक विकास संस्था संचलित कृषी महाविद्यालय सरळगांव कृषी वर्धिनी विभागातील विदयार्थ्यांनी बळेगाव येथे गाई,म्हैसी,बैल, लहान लहान वासरे आजारी पडू नये,तसेच त्यांना कोणत्याही साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव,एच डी जाधव सर,शेतकरी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला कि साथीचे रोग सुरु होतात आणि या रोगा मध्ये जनावरे आजारी होतात साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता बळेगाव येथील योगेश विशे यांच्या फार्मावर जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव यांनी गाई,म्हैसी,बैल,वासरे यांना लसीकरण केले यावेळी उपस्थित शेतकरी विध्यार्थी यांना पाळीवप्राण्याच्या साथीच्या रोंगांची सखोल माहिती देत यावर कोणते उपाय केले पाहिजेत,कोणते आजार होतात या बाबत माहिती दिली बळेगाव येथे पहिल्यांदा जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर घेण्यात आल्याने या शिबिरात करण्यात आलेल्या लसीकरणाने जनावरांचे आरोग्य निश्चितच सुरक्षित राहील म्हणत शेतकऱ्यांनी विद्यार्थी,शिक्षक,डॉ सूर्यराव यांचे आभार व्यक्त केले. लसीकरण शिबिरा वेळी पावसाळ्या मध्ये विशेष करून FMD,HS,Botolizum या सारखे साथीचे रोग जनावरा मध्ये पाहण्यासाठी मिळतात असल्याने एफ एम डी,या रोगावर डॉ. सूर्यराव यांनी लसीकरण केले यावेळी कृषी विद्यालयाचे विध्यार्थी रिचा डोईफोडे,तन्वी खामगांवकर,सिद्धी कारभारी,सानिका कारभारी,अपूर्वा केंजळे,कोमल खुशह,विश्वजीत पोतदार,आर्यन ऊंडे,शुभम भगत,यश कराळे,रोहन कनसे,यश वाघ,स्वराज कापसे,ओमकार नारूडकर,सिद्धार्थ सुंदरे,साईराज वाबळे,साईनाथ नरके, सुरज पवार,या विदयार्थ्यांनी लसीकरण शिबीर यशस्वी केले.

माझा प्रभाग माझी जिम्मेदारी

माजी नगरसेविकेचे राहिवाश्यांकडून आभार मुंबई : प्रभाग क्रमांक 20 (अ ) येथे ठाणेकर वाडी कन्हैया नगर येथील मार्गावरती राजश्री शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच टीकम सोसायटी, संत…

नवीन ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात येणार अधिक सुलभता आणि पारदर्शकता- सर्जेराव सोनवणे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४२ रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.* राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन २०१७ मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत. या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई-केवायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ, प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण, ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण ) व मोबाईल सीडींग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच ज्या सदस्यांचे ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण)व मोबाईल सीडीग अद्याप झालेले नाही, अशा सदस्यांना नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांत सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा.

अंबानीचे कर्ज माफ करू शकता, मग सर्वसामान्यांचे का करत नाही ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल रमेश औताडे मुंबई : मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचे ५ हजार कोटी कर्ज माफ करणारे सरकार सर्वसामान्य जनतेला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. कर्जमाफी दूरच मात्र दिलेली आश्वासनही पाळत नाही. तीन महिन्यात माहाविकास आघाडीचे सरकार आले की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार. असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना दिले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात राज्य परिवहन कामगार, अंगणवाडी, आशा सेविका, गट प्रवर्तक, बचत गट प्रशिक्षण देणारे उमेद चे कामगार, शिक्षक, असे अनेक घटक आपल्या मागण्या घेऊन आले आहेत. सर्वांनी आप आपले मंडप टाकले आहेत. नाना पटोले प्रत्येक मंडपात जाऊन आश्वासने देत टाळ्या घेत आहेत. भर पावसात चिखल झाला आहे. माश्या घोंगावत आहेत. मेट्रो चे बांधकाम व मुलांचा क्रिकेट सराव सुरू असल्याने मैदान अपुरे पडत आहे. त्यामुळे दाटीवाटीने आंदोलनकर्ते एकच गर्दी करून मैदानात आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आले आहेत. अधिवेशन जस जसे संपत जाते तस तसे आंदोलनकर्ते गर्दी करत असतात. आता या सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनकर्ते राज्यभरातून आले आहेत. सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत महिला आक्रमक झाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मैदानात महिलांनी आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या  बाटल्यांचा खच पडला होता. सरकारने आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून आम्ही काय करू ते कळेलच असा इशारा यावेळी दिला.

वरंध घाट ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद-किशन जावळे

रायगड :रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड-वरंध घाट हा रस्ता कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूकीसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. रायगड जिल्हा हद्दीतील…

एनडीआरएफच्या प्रशिक्षणचा उपयोग नवी मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी – शरद पवार

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी होणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी दिली आहे.* जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ जवान ज्या समर्पित भावनेने नियोजनबध्द मदतकार्य करतात ते स्पृहनीय असल्याचे सांगत त्यांनी एनडीआरएफमार्फत आज मिळणारे प्रशिक्षण नवी मुंबईतील शहर आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. अनिता जवंजाळ, यशदाचे मुख्य प्रशिक्षक योगेश परदेशी तसेच एनडीआरएफचे निरीक्षक जालिंदर फुंडे उपस्थित होते. पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते याची विस्तृत माहिती देत एनडीआरएफचे निरीक्षक जालिंदर फुंडे यांनी एनडीआरएफची मदत कुठे घेता येऊ शकते यावर भाष्य केले. २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत त्यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी व कार्यवाहीची सादरीकणाव्दारे माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्तीआधी, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहका-यांसह प्रात्याक्षिके दाखविली. आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तूंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसेच अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.

राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

ठाणे : राज्यात राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सामजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज  (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) यांच्या वतीने दि.5 जुलै 2024 रोजी  महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य ए. आर. कूसुंबे, पर्यवेक्षक राजेश रोहिदास, महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार व सर्व समतादूत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री.गुरुनाथ देशमुख होते त्यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच नशा मुक्ती व व्यसन यावर खूप मार्मिक कविता सादर करून विद्यार्थांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शेळके यांनी केले. समतादूत नितिन वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सामाजिक न्याय दिवस याबाबत थोडक्यात माहिती दिली. आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी केले.

डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा दाखल

 गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका अनिल ठाणेकर ठाणे, उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला. रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (रा. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव व शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले. रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या साथीने उल्हासनगर पोलिसांंनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने, अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली. अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अध्यात्मिक गुरुकुल आश्रमातील लहान मुलांना विविध  वस्तूंची भेट

ठाणे : नगर, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या  समूहाच्या वतीने ३० जून २०२४ रोजी शिर्डी, राहुरी, नगर, उंबरे या गावी विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल या आश्रमात लहान मुलांस गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोलर पॅनल, अन्नधान्य, शालेय वस्तू, रोख रक्कम तसेच आश्रमच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना युवासेना तालुका प्रमुख राहुल जुवाडी,  सचिन मोरे, राहुल मोरे, ग्रुपचे संस्थापक, संचालक, अध्यक्ष, सेक्रेटरी, सल्लागार व ग्रुप मधील ७० ते ८० सदस्य उपस्थित होते. आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपच्या वतीने समाजसेवे अंतर्गत हा २२ वा उपक्रम साजरा करण्यात आला. या आश्रमचे सर्वेसर्वा दुशिंग महाराज यांनी आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे संस्थापक संतोष पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करून त्यांचा व सौ.सोनिया वहिनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मला एक रुपयाचाही निधी दिला नाही-आव्हाड

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मी अजित पवारांच्या पीएला १०० वेळा फोन केले, पण त्यांनी मला भेटीची वेळही दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…