Month: July 2024

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपीचा वावर असलेल्या बारवर पालिकेचा हातोडा

अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त     मुंबई : जुहू येथील हॉटेल किंग इंटरनॅशनल लगतच्या ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केले.वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी जुहू येथील ग्लोबल तापस बारमध्ये मित्रांसमवेत मद्यप्राशन केले होते. त्यांनतर, दारूच्या नशेत असतानाही त्याने मोटार चालविली. बेदरकारपणे मोटार चालवत असताना वरळी येथे दुचाकीला धडक देऊन वृध्द दांपत्यास चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर, कायद्याचे पालन न करता आरोपीला दारू दिल्याप्रकरणी बारवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी बारमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. 00000

 विद्यार्थ्यांची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात कृती

 सीवूड्सच्या एसएस हायस्कुलमध्ये वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या केल्या तयार   नवी मुंबई: स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला विघातक असणा-या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा विभाग कार्यालयांमार्फत तसेच परिमंडळ स्तरावरील पथकांमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या मोहिमेमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेसोबत प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे तसेच घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस या ठिकाणी परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री.  शशिकांत तांडेल आणि स्वच्छता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस येथील विद्यार्थ्यांना प्लास्टिकपासून होणारी मानवी जीवनाची व निसर्गाची हानी विविध प्रकारची माहिती देत पटवून देण्यात आली तसेच प्लास्टिक पिशव्यांनी कापडी – कागदी पिशव्यांचा पर्यावरणपूरक पर्याय वापरात आणावा यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वर्तमानपत्रांपासून आकर्षक कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रद्दीत जाणा-या वर्तमानपत्रांचा उपयोग पिशव्यांकरिता होत असल्याने व तोही स्वत:च्या हाताने पिशव्या बनवून केला जात असल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. थ्री आर ची संकल्पना राबविताना टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना कच-याचे घरापासूनच 3 प्रकारे वर्गीकरण करणे, कम्पोस्ट पीटव्दारे कच-याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, थ्री आरचे महत्व अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली व त्याची स्वत:पासूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई यांचे बेलापूर विभाग कार्यालयाला अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक तसेच माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाटील व श्रीम. ज्योत्स्ना नायर आणि शिक्षकवृंद तसेच बेलापूर विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 000

जिल्ह्यात ४ हजारांच्या वर संवादक कुटुंबांना भेटी देऊन संवाद साधणार – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड     अलिबाग : रायगड जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व निळा सुका अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर अभियान ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ५ असे ४ हजार ४५ संवादक कुटुंबांना गृहभेटी घेवून संवाद साधणार आहेत. त्यानुसार कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन मध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखलें यांनी केले आहे.* शास्वत स्वच्छतेसाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृह भेटीच्या माध्यमातून जनजागृती साठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच संवादक घराना भेटी देऊन ओला, सुका कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन बाबत माहिती देतील..यासाठी जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार ४५ संवादक कार्यरत राहतील. संवादक म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती,,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेवीका,गट समन्वयक, जल सूरक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. अभीयान अंतर्गत संपादकांनी गावातील सर्व कुटुंबाना‌ भेटी देऊन अभियानाची माहिती द्यायची आहे. गाव पातळीवर स्वच्छतेची लोक चळवळ उभी करण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे. दर आठवड्याला राज्य स्तरावरून गृह भेटीचां आढावा घेण्यात येणार आहे.

महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे-आयुक्त सौरभ राव

ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची…

मुरबाड तालुक्यात ४० गावे  टँकरमुक्त – रोहन घुगे

ठाणे :  २०२० ते २०२४ या पाच वर्षात ८६ टंचाईग्रस्त गाव- पाडे होते. यावर्षी जल जीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकूण ४० गाव- पाडे कायमस्वरुपी टँकरमुक्त करण्यात आले आहेत.  प्रगतीपथावरील…

आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांनी केले पारसिक टेकडी येथे वृक्षारोपण

ठाणे : आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांच्या मदतीने संस्थेच्या ७ व्या  वर्धापनाचे औचित्य साधत पारसिक टेकडी कळवा, ठाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण २५ करंजाची रोपटे लावण्यात आली. त्याचे कारण असे की, आपल्या भागातील हवामानात करंज झाडाची वाढ चांगली होते तसेच या झाडाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व स्थान आहे. शासनाचा देखील वन महोत्सव आता चालू आहे. तापमान वाढ व पाणीटंचाई यामुळे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप वर्षभर पारसिक टेकडीवर झाडे लावून त्यांचे संगोपन देखील करत असते. चांगलं काम करणाऱ्या संस्था बरोबर आनंदवाटा प्रतिष्ठान नेहमी स्वतःला त्यांच्याशी जोडून घेऊन वर्षभर पर्यावरण व शैक्षणिक उपक्रम राबवितात. या वेळेच्या उपक्रमात तरुण मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.  पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप व उपस्थित तरुण मुलांचे आनंदवाटा  तर्फे कृतज्ञता व्यक्त  करून “साथी हात बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर पेड लगाना “हे  गाणे सर्वांनी सामूहिक रित्या गाऊन वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती संस्थेचे सभासद रवींद्र निर्मला तानाजी ह्यांनी दिली.

मंगळवारी पावसाचा व्यत्यय नाही, तरीही मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची घडी मंगळवारीही जैसे थेच होती. मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित वेळेत लोकल मिळत नव्हती. त्यामुळे…

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. या प्रचंड धावपळीतही विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. जितेंद्र भोळे यांची ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ  पत्रकार श्री. विलास मुकादम…

 ‘ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मेहनत केल्यास निश्चित यश मिळते’

गुणगौरव समारंभात कपिल पाटलांचा विद्यार्थीना सल्ला राजीव चंदने     मुरबाड : ध्येय डोळ्या समोर ठेऊन मेहनत घेतल्यास निश्चित पणे यश मिळते असा कानमंत्र माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड येथिल विध्यार्थी गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांना दिला. भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी बारावी, पदवी व कला क्रीडा क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ मुरबाड मधील माऊली गार्डन येथे मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी पाटील हे बोलत होते. याप्रसंगी,माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, हरेश खापरे,नारायण गोंधळी,उल्हास बांगर, सुभाष घरत,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, दिपक खाटेघरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल तोंडलीकर,संजय हंडोरे,महेंद्र पवार, आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना पाटील म्हणाले की ठाणे जिल्ह्या सारख्या ग्रामीण भागातही विदयार्थ्यां मध्ये प्रचंड प्रमाणात गुणवत्त्ता आहे, मात्र विदयार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाणे गरजेचे आहे, डॉक्टर, ईजींनीयर, यासारख्या तत्सम पदव्या घेऊन ही विदयार्थ्यांनी त्यावरच अवलंबून न राहता यु पी एस सी, एम पी एस सी, यासारख्या परीक्षा देऊन लोकसेवा करावी, यावेळी विदयार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात करियर कसे उज्वल करावे याबाबत पुणे येथील करियर व्याख्यात्या ऍड.अदिती निटूरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यावेळी शेकडो विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, यावेळी गुणवंत विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्न देऊन गौरविण्यात आले. 0000