Month: July 2024

ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने

नमुंमपा कर्मचा-यांना एनडीआरएफ मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण       ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ जवान ज्या समर्पित भावनेने नियोजनबध्द मदतकार्य करतात ते स्पृहनीय असल्याचे सांगत त्यांनी एनडीआरएफमार्फत आज मिळणारे प्रशिक्षण नवी मुंबईतील शहर आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. अनिता जवंजाळ, यशदाचे मुख्य प्रशिक्षक श्री. योगेश परदेशी तसेच एनडीआरएफचे निरीक्षक श्री. जालिंदर फुंडे उपस्थित होते. पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते याची विस्तृत माहिती देत एनडीआरएफचे निरीक्षक श्री. जालिंदर फुंडे यांनी एनडीआरएफची मदत कुठे घेता येऊ शकते यावर भाष्य केले. 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत त्यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी व कार्यवाहीची सादरीकणाव्दारे माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्तीआधी, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहका-यांसह प्रात्याक्षिके दाखविली. आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तूंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसेच अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी होणार आहे.

 राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार २०२४’ साठी रोख १ लाखाहून अधिक पारितोषिके

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने साहित्य पाठविण्याचे आवाहन     ठाणे : साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान करणाऱ्या राज्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी रूपये १ लाखाहून अधिक रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारी २०२३ मराठी भाषा गौरव दिवस ते २७ फेब्रुवारी २०२४ मराठी भाषा गौरव दिवस या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, ललित लेखन, विनोदी साहित्य, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, वृत्तबद्ध काव्य साहित्य, स्त्रीवादी साहित्य, गजल साहित्य, ऐतिहासिक साहित्य, लक्षवेधी साहित्य या पुरस्कारांसाठी साहित्य मागविण्यात येत आहे. ‘साहित्यवलय’ या पुरस्काराचे स्वरूप ५ हजार ५५५ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लक्षवेधी साहित्यासाठी १ हजार रूपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली. साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी कथा, कविता, कादंबरी या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट साहित्यकृतीला पुरस्कृत करण्यात येईल. पुरस्कार सोहळा ठाण्यात होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने पहिल्यांदाच साहित्य क्षेत्रातील नवोदित लेखकांच्या पहिल्या पुस्तकासाठी साहित्यवलय साहित्य पदार्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक साहित्यिकांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून ठराविक उत्कृष्ट पुस्तकांना ‘साहित्यवलय लक्षवेधी साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याचबरोबर साहित्यवलय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार, साहित्यवलय विनोदी साहित्य पुरस्कार, साहित्यवलय बालसाहित्य पुरस्कार, साहित्यवलय अनुवादित साहित्य पुरस्कार, साहित्यवलय वृत्तबद्ध काव्य साहित्य पुरस्कार, साहित्यवलय स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, साहित्यवलय गजल साहित्य पुरस्कार, साहित्यवलय ऐतिहासिक साहित्य पुरस्कार अशा विभागात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अधिकाधिक साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृती पाठवाव्यात असे आवाहन पाचंगे यांनी केले. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्प परिचय आणि पासपोर्ट फोटोसह १५ जुलै२०२४ पर्यंत पाठवावे. धृपद एन्टरटेन्मेंट, १३०६, जे व्ही एम वेदा, ट्रॅफिक सिग्नल पार्क जवळ, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे प. ४००६१५ या पत्त्यावर साहित्य पाठविण्याचे आवाहन पाचंगे यांनी केले. अधिक माहितीसाठी 9773953775 या क्रमांकावर संपर्क साधावा. 000000

कंत्राटी कामगारांची मागण्यांसाठी १८ जुलैला ठामपा मुख्यालयावर दिंडी

अनिल ठाणेकर     ठाणे : महानगरपालिकेची कायमस्वरूपी बारामाही आणि सतत नियमितपणे चालणारी कामे कंत्राटी कामगारांच्या कडून करून घेतली जातात. मात्र वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन आणि अन्य कायदेशीर सोयी सुविधा देताना ठेकेदार लबाडी करतात. महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प राहून ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याने सर्व विभागातील कंत्राटी कामगार श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त सौरव राव यांना साकडे घालणार आहेत. या वेळी विविध प्रमुख मागण्यांबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरण्यात येईल, अशी माहिती महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली. आत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व  सोयी सुविधा लागु करा. ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. कंत्राटी कामगारांना मृत्यु किंवा वयोमानानुसार कामावरुन कमी केल्यानंतर उपदानची रक्कम एका महीण्याच्या आत अदा करा, शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना दरमहा २६ दिवसाचे वेतन, मे महिना, दिवाळीच्या सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात काम द्या / वेतन द्या, प्रत्येक कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन,गणवेश, ओळखपत्र, वेतनस्लिप, सुरक्षिततेची साधणे, पावसाळी रेनशूट , गमबूट आदी  वाटप करा, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा, कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. किंवा कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा. आदी मागण्यांसाठी सर्व विभागातील कंत्राटी कामगार, सफाई कामगार, वाहनचालक, वाल्वमेन आदींनी मिळून श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त श्री सौरव राव यांना साकडे घालणार आहेत, असेही महासचिल जगदीश खैरालिया यांनी सांगितले. अजय भोसले (कार्यकारी सचिव), सुनील दिवेकर, संतोष देशमुख, स्वाती देशमुख, अर्चना पवार (शिक्षण विभाग), भास्कर शिगवण (रस्ते सफाई), गणेश चव्हाण (पाणी पुरवठा विभाग) सूरज वाल्मिकी आदी कार्यकर्त्यांनी कामगारांना मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. 00000

अध्यात्मिक गुरुकुल आश्रमातील लहान मुलांना विविध  वस्तूंची भेट

ठाणे : नगर, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या  समूहाच्या वतीने ३० जून २०२४ रोजी शिर्डी, राहुरी, नगर, उंबरे या गावी विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल या आश्रमात लहान मुलांस…

सायकल आणि शिक्षण यांना जोडणाऱ्या सायक्लोएज्युकेशन उपक्रमाचे दुसरे पर्व

ठाणे : आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने सायकल आणि शिक्षणाशी जोडणाऱ्या सायक्लोएज्यु या उपक्रमाचे दुसरे पर्व रविवारी संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका आणि इतर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या…

सरकारी आदेशाला सिडको कडून केराची टोपली

रमेश औताडे     मुंबई : आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळावी म्हणून विधानसभेत आदेश झाल्यानंतरही सिडको प्रशासन मनमानी कारभार करत असून सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील…

भर पावसाळ्यात ६५ लाख मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

रमेश औताडे     मुंबई :मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ६५ लाख गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविकांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला असल्याने भर पावसाळ्यात…

उज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने राज्यपालांच्या उपस्थितीत सन्मानित

मागासवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करू – राज्यपाल रमेश बैस अशोक गायकवाड       मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४५ साली स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही देशातील…