Month: July 2024

प्रकाश आंबेडकरांनी माविआसोबत यावे

वर्षा गायकवाडांचे आवाहन मुंबई : लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती, महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहेत असा विश्वास नवनियुक्त खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीसोबत यावं, आपण महाविकास आघाडीचं सरकार आणुया असं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेस मुख्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मीही भीमकन्या आहे. मलाही पाठिंबा दिला असता तर समाधान वाटलं असतं. मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी सोबत यावं असं आवाहन मी करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

अंबादास दानवेंचे निलंबन मागे 

मुंबई  : विधान परिषद सभागृहात शीवीगाळ करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांचे निलंबन त्यांच्या माफीनंतर मागे घेण्यात आले.  कॉग्रेसनेते राहुल गांधीं यांनी संसदेत हिंदूत्वावर केलेल्या वक्तव्यावरुन झालेल्या गदारोळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिविगाळ केली होती. विधिमंडळात शिवीगाळ करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ५ दिवसाकरीता निलंबन मंगळवारी  करण्यात आले होते. आज त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याच्या त्यांच्या विनंतीवरून त्यांचे निलंबन मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तो बहुमताने संमत करण्यात आला. गेल्या सोमवारी अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात होते त्यावेळी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती. मात्र त्यांच्या पक्षाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.  दरम्यान आज दानवे यांनी झाल्या वक्तव्या बाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आज त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला तो सहमत करण्यात आला. उद्या शुक्रवार ५ जुलैपासून दानवे कामकाजात भाग घेतील.

अजि म्या देव पाहीला !

स्वाती घोसाळकर मुंबई : मुंबईच्या क्रिकेट पंढरीत आज जग जिंकणारे क्रिकेटच देव अवतरले. या देवाचे दर्शन घेण्यासाठी अवघी मुंबई आज रस्त्यावर लोटली. अजि म्या देव पाहिल्याच्या थाटात क्रिकेटच्या या भक्तांनी आपल्या दैवतांचे…

मुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणीसाठी धमकी, ज्योतिषाची पोलीस उपायुक्तांकडे तक्रार

अनिल ठाणेकर     ठाणे : मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला संकेत पुजारा नामक एका इसमाने चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ज्योतिषाने या…

बेलापूर व तुर्भे विभागात 9 अनधिकृत रेस्टॉरंट, बार व पबवर तोडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल / बार आणि रेस्टॉरंट / लेडीज बार / पब / लॉज / हुक्का पार्लर यांच्यावरील कारवाई तीव्रतेने राबविण्यात येत…

नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन, मोदी-शहा जबाबदार- राजन राजे

  अनिल ठाणेकर     नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन असल्याचा आणि याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमीत शहा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केला…

डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी शिबिर

अशोक गायकवाड     रायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरिक्त…

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी धडक मोर्चा

रमेश औताडे     मुंबई : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने २३ जुलै रोजी मंत्रालय आरसा गेट सहित सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंच टाईम मध्ये…

२ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा;

ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी     ठाणे : जिल्ह्यातील बदलापूरजवळील कोंडेश्वर तसेच इतर धबधब्यांच्या परिसरात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. धबधब्याजवळच्या एक किमी परिसरात हे आदेश…

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना २० वर्षांची शिक्षा

ठाणे : एका 12 वर्षीय मुलीवर अपंगासह दोन जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर दखल घेत ठाणे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोषींमध्ये नरेश उर्फ ​​दादू अशोक…