मुंबई, दि. (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेल्या ” आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” या व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून अनाथाश्रम, वृध्दाश्रम, दर वर्षी दादर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त चहा व अल्पोपहार याचे वाटप असे समाजसेवेचे विविध २२ उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येतात. या वॉट्स अप समूहातर्फे २३ वा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मातोश्री बंगला वांद्रे येथे बाळासाहेबांचे दर्शन करण्यास येणाऱ्या शिवसैनिकांना १०० किलो लाडू वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ते तसेच महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक यांनी लाडू वाटप करत असलेल्या स्टॉलला भेट देऊन ” आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” या ग्रुप मधील सर्व शिवसैनिक सदस्यांचे भरभरून कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी कमिटी संस्थापक संतोष पाटील, संचालक महेंद्र गुरव, अध्यक्ष दत्तात्रय घुले उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, उपाध्यक्ष सुरेश वाडकर, सेक्रेटरी लवेश म्हात्रे, उप सेक्रेटरी वासंती गोताड, उप सेक्रेटरी सुजाता धारगळकर, खजिनदार सूर्यकांत कडू, उपखजिनदार सोनिया पाटील उपखजिनदार संदीप गुरव, कार्यालय प्रमुख रणजीत नरवणकर, उपकार्यालय प्रमुख विलास चव्हाण, उपकार्यालय प्रमुख भालचंद्र उकिरडे, सल्लागार दिलीप गावडे, सल्लागार जितेंद्र पाभरेकर, सल्लागार संतोष झोल, कार्यकारणी सदस्य अजय चिपळूणकर या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *