महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी
ठाणे : महाराष्ट्रात जिल्ह्यातील दीड, दोन महिन्यापासून सातत्याने होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने निषेध करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गृहमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी द्रुगती न्यायालयात निकाल लावला जावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
बेलापूर येथील अक्षता म्हात्रे तिच्यावर मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेला बलात्कार आणि निर्घृण हत्या, उरण मधील युतीवर बलात्कार आणि निर्घृण हत्या, मावळ येथील महिलेची हत्या आणि लातूर येथील वस्तीगृहात झालेल्या १३ वर्षीय मुलाची हत्या, या सर्व घटनांना जातीचा आधार आहे. महिला वर्ग आणि जातीय द्वेषातून त्या करण्यात आल्या आहेत. रिपाइं कार्यकर्त्यांनी या घटनांचा निषेध केला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत गृहमंत्र्यांनी राजीनामा आलेला अशी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय समोर शासकीय विश्रामगृह समोर झालेल्या या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात रिपाइंचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रकरणातून सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई केली नाही तर पुढील आंदोलन अधिक उग्रपणे केले जाईल असा इशारा ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी दिला. त्यामध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, महासचिव प्रमोद इंगळे, प्रवक्ता विकास चव्हाण, कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, युवा अध्यक्ष विनोद भालेराव, युवा कार्याध्यक्ष विशाल ढेंगळे, उपाध्यक्ष शहाजीराव दुपारगुडे, उपाध्यक्ष बबनराव केदारे, प्रसिद्धी प्रमुख तात्याराव झेंडे, युवक महासचिव अशोक कांबळे, महिला उपाध्यक्ष विमलताई सातपुते, वागळे विभाग युवा पमुख शंकर पाटील, संघटक आप्पा काकडे, वर्तक नगर विभाग प्रमुख युवराज वाव्हळ, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तू सूर्यवंशी, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण फुलवरे, कोपरी युवा विभाग प्रमुख बाळा भट, सुभाष नगर वार्ड अध्यक्ष रमेश भालेराव, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश आठवले, युवक आघाडी अक्कू यादव, सुनील वानखडे विशाल सोनवणे रामदास घुगे, दिनेश पाटील कैलास सुरवाडे अजय गांगुर्डे, अजय परमार आदी कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000