नवी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन साठी ठाणे बेलापूर मार्गावर चिंचपाडा गावाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू आहे. नवी मुंबई शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलन दरम्यान झोपडपट्टी वासीय प्रचंड संख्येने उपस्थित झालेले आहेत. मात्र त्यामुळे ठाण्याकडून तुर्भे बेलापूर दिशेची वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी तीन पैकी एकच मार्गिका सुरू ठेवल्याने किमान पाऊण किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
याच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती ही बाब लक्षात आल्यावर स्वतः विजय चौगुले यांनी भाषण थांबवून रुग्णवाहिकेला मार्ग देण्याचे आवाहन केले आणि काही वेळेत रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर पडली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दमछाक होत आहे.त्यामुळे वाहतूक पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.
वाहतूक कोंडी पाहता साडे अकराच्या सुमारास चौगुले यांनी सर्वांना घरी जाण्याचे आवाहन केले. केवळ उपोषणात सहभागी असणाऱ्या आंदोलकांनी थांबावे असे आवाहन केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *