माजी महापौर नईम खान राष्ट्रवादीत, प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
अनिल ठाणेकर
ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नईम नजीर खान यांचा मुंबई येथिल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. प्रांताध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. नईम खान यांचा पक्ष प्रवेश, प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या पुढाकाराने झाला.
यावेळी विधानपरिषदेचे आमदार पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, नगरसेवक मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष शेख जाफर नोमानी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रफिक शेख, समाजसेवक राजु अन्सारी, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक सर्फराज अन्सारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष जसबीर (बिलाल) शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंब्रा-कळवा विधानसभा कार्याध्यक्ष सर्फराज काझी हे देखिल उपस्थित होते.
0000