माथेरान करांची मागणी
माथेरान : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून क्षत्रिय मराठा समाज माथेरान कडुन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी.अशी मागणी समस्त ग्रामस्थासह गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता माथेरान क्षत्रिय मराठा समाजातर्फे मा.अधीक्षक माथेरान व मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक माथेरान यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे,बिना कदम, प्रियांका कदम, अर्चना भिल्लारे,ज्योती घाग,प्रदीप घावरे,कुलदीप जाधव,जनार्दन पार्टे, संदीप शिंदे, विजय कदम, मंगेश सकपाळ,नारायण कदम,गिरीश पवार, मनोहर रांजणे,अरविंद शेलार, अरविंद रांजणे यांसह माथेरान मधील सर्व पुरुष व महिला कार्यकारिणी मंडळ व ज्ञाती बांधव उपस्थित होते.
00000