ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेने दिली.
एशियन पेंट कलरचा ट्रक घेऊन चालक निलेश मस्के हे खंडाळ्यावरून बडोद्याला निघाले होते. घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर तो ट्रक उलटला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास समोर आली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.
तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मार्फत ०२-हायड्रा मशीनच्या मदतीने रोडवरती पलटी झालेल्या ट्रक रोडच्या एका बाजूला केला. दरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवरती अपघात झाल्यामुळे पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात होता. तर पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *