गणेश नाईक यांच्या विरोधात उपोषण
विजय चौगुले यांची प्रकृती ढासळली
ऐरोली:: नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मागणीसाठी नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात बंद पाळण्यात आला आहे ऐरोली रबाळे तिघा परिसरात कडकडीत बंद असून अन्यत्र संमिश्र प्रतिसाद आहे बंद साठी कुठलेही आवाहन करण्यात आले नसून व्यापारी नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे बंद केला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे दरम्यान काल रात्रीपासून विजय चौगुले यांची तब्येत बिघडली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे मात्र त्यांनी उपचार होण्यास नकार दिला आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
नवी मुंबईतील एमआयडीसी भागात असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन मागणी मान्य होऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते मात्र ऐरोली चे भाजप आमदार गणेश नाईक यांनी हे काम बंद केले या विरोधात विजय चौगुले शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यांनी त उपोषण एक ऑगस्ट पासून सुरू केले यादरम्यान काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते अध्याप त्यांना आराम पडलेला नाही अशी माहिती चौगुले यांच्या आजपर्यंत स्विय सहाय्यक यांनी दिली.
चौगुले यांनी पुकारलेल्या बंद याच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात संपूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे व्यापाऱ्यांनी यांना उत्स्फूर्तपणे समर्थ म्हणून बंद पुकारला आहे ऐरोली दिघा परिसरात कडकडीत बंद असून कोपरखैरणे आणि घनसोलीत बहुतांश दुकाने बंद होती मात्र वैद्यकीय सेवा देणारे दुकाने आणि दवाखाने सुरू आहे.
0000
