अनिल ठाणेकर
ठाणे : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मीना अलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून मिना दादाराव अलिंग यांची ओळख आहे. याआधी त्यांनी वॉर्ड अध्यक्ष, ठाणे जिल्हा महासचिव, ठाणे शहराध्यक्ष अशी पदे भूषविलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मीना अलिंग या सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली प्रा. कवाडे यांनी नियुक्तीपत्र देताना मीनाताई अलिंग यांचे कौतूक केले. तसेच , पक्षसंघटना वाढविण्याचे आदेश दिले. याप्रसंगी उल्हासनगरचे माजी नगरसेवक, पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे, महेंद्र पवार, सायली, आनंद कडाले, अनिल रुकमारे, बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे, बेबीताई आदी मान्यवर उपस्थित होते.