ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपा मिडिया सेल केंद्रीय समन्वयक तथा कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माळी समाज अध्यक्ष नवनीत सिनलकर, कार्याध्यक्ष डॉ. अक्षय झोडगे, उपाध्यक्ष श्रीधर रासकर, सरचिटणीस स्वप्नील वाघोले, खजिनदार दशरथ साबळे, महिला संघटक अलका सिनलकर, महिला उपाध्यक्ष अरुंधती डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
00000
