२० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे मुंबईत येणार

स्वाती घोसाळकर

मुंबई : विधानसभेसाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात मविआने मात्र आघाडी घेतल्याचे दिसत आहे. येत्या २० ऑगस्टरोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकाजुर्न खरगे आणि लोकसभेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या पक्षप्रमुखांसोबत चर्चा होऊन जागावाटपाचे अंतिम सुत्र ठरवण्यात येईल.

येत्या 20 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे या निमित्त मलिकाजुर्न खरगे आणि राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. यावेळी  महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहीती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.

ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती, त्याचप्रमाणे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, आणि ठाकरेंची शिवसेना  विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे चेन्निथला यांनी सांगितले.”

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभेतील निकालामुळे मविआचे मनोबल उंचावले आहे. निवडणूकी आधी पक्ष आणि  चिन्ह याचा निकाल आला तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला सहानभूती मिळू शकते. निकाल यांच्या बाजूने लागला किंवा विरोधात गेला तरी त्याचा फायदा ठाकरे आणि शरद पवारांनाच होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

चौकट

मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही महायुतीची डोकेदुखी ठरली आहे. त्यात जरांगेने पुकारलेले मराठा आंदोलनाचा फटकाही महायुतीला बसला आहे. यासगळ्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री शिंदे रात्री रात्री दिल्लीत जाणार असल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान. महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्ली दौरा नियोजित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *