मुंबई – एन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्बला २४ तास उलटत नाही तोच आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पोलिस अधिकारी संजय पांडे यांनी मला फसवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात ते स्वता फसल्यानंतर देशमुखांचा मुलगा सलिल माझ्याकडे माफी मागायला आला होता असा सनसनाटी गोप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. आणि यासाठी आपण स्वता नार्कोटेस्टलाही सामोर जायला तयार आहोत असे परबीर सिंग म्हणाले.

एप्रिल २०२१ मध्ये अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे मला एट्रिया मॉलमधील स्टारबुक्समध्ये भेटले होते. त्यांनी मला हात जोडले, माझे पायही पडायला ते तयार होते. मला राज्याचा पोलीस महासंचालक बनवू. माझ्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल खुद्द अनिल देशमुख माफी मागायला तयार आहेत असं सलील देशमुखांनी सांगितले होते असा गौप्यस्फोट मुंबई पोलीसचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.

अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपात आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. परमबीर सिंह म्हणाले की, एक आयपीएस अधिकारी म्हणून मी पदाची प्रतिमा जपली, कधीही सार्वजनिकरित्या आरोप केले नाहीत. मात्र आज अनिल देशमुखांनी माझ्यावर जे गंभीर आरोप केलेत त्यावर मला प्रतिक्रिया देणं गरजेचे वाटले. एप्रिल २०२१ मध्ये संजय पांडे यांनी मला कार्यालयात बोलावून धमकी दिली होती. त्याआधी फोनवरही धमकी दिली होती. जर मी देशमुखांवर केलेले आरोप मागे घेतले नाहीत तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाईल आणि संपूर्ण सरकारच्या ताकदीचा सामना करावा लागेल. मी घाबरलो नाही. या सर्वांचे फोन रेकॉर्ड मी सीबीआयला दिलेत. सुप्रीम कोर्टातही ते सादर केलेत. मला धमकी दिली जात होती. गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता असंही परमबीर सिंह यांनी सांगितले

तसेच मी जे सांगतोय, संजय पांडे यांनी धमकी दिली, अनिल देशमुख हे खोटे आरोप करतायेत, सलील देशमुख मला भेटले याबाबत मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण ती नार्को टेस्ट अनिल देशमुख, संजय पांडे, सलील देशमुख यांनीही दिली पाहिजे. अनिल देशमुख, सोनू जलान, रियाज भाटी यांची बंगल्यावर भेट झाली होती. जिथे संजय पांडेही हजर होते. तिथे माझ्याविरोधात कशारितीने गुन्हे दाखल करावेत याचं प्लॅनिंग केले. इतर गुन्हेगारांनाही अनिल देशमुख, संजय पांडे एकएक करून बोलावून माझ्याविरोधात कसे आरोप करायचे याचं गाईड करायचे. संजय पांडे मला धमकी देत होते त्याचे रेकॉर्डिंगही आहे. अनिल देशमुख, संजय पांडे नार्को टेस्ट करायला तयार असतील तर मीदेखील नार्को टेस्ट करेन. अनिल देशमुखांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप लावलेत त्यावर मी काहीच बोलणार नाही असंही परमबीर सिंह यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोनू जलान हा क्रिकेट बुकी असून अनिल देशमुखांच्या बंगल्यावर त्यांची बैठक झाली होती. रियाज भाटीने हायकोर्टाने याचिका केलीय त्यात अनिल देशमुखांसोबत फोटोही जोडला आहे. बंगल्यावर कोण कोण होते तेही सांगितले आहे. संजय पांडे यांनी त्यांना गाईड केले होते. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते. सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेत माझ्यावरील आरोपांची चौकशी राज्य सरकारकडून काढून सीबीआयकडे सोपवली. आता जे समोर आलंय ते १० टक्केच आहे. इतर जे अधिकारी आहेत, ज्यांच्याकडून या लोकांनी खंडणी घेतली ते समोर येण्याची हिंमत करत नाहीत. जर नार्को टेस्टसाठी ते तयार असतील तर मीही तयार आहे असं चॅलेंज परमबीर सिंह यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *