३ ऑगस्टला टाऊन पोलीस स्टेशन (ठाणे ) येथे कुटुंब फाउंडेशनतर्फे हेल्मेट वाटपचा कार्यक्रम राबविण्यात आला. पोलीस म्हटलं की, आपले रक्षक. आज त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्याचे ऋण आपल्या सर्व जनतेवर आहे. म्हणून एक छोटासा विचार आपले कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र आप्पाजी गोरे यांच्या मनात आले व त्यांनी खास पोलिसांसाठी हेल्मेट वाटण्याचे ठरवले. आज ठाणे येथे टाऊन पोलीस स्टेशनला कुटुंब फाउंडेशनतर्फे हेल्मेट वाटप करण्यात आले. टाऊन पोलीस स्टेशनचे सिनीयर .पी.आय देशमुख यांनी पण कुटुंब फाउंडेशनचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला ठाणे पोलिसचे शुभांगी सिंगानजुडे, सामिना सय्यद , तसेच API वैशाली सरवदे, क्राईम परफेक्ट रिपोर्टचे रिपोर्टर महेंद्र चव्हाण व मयुरी चव्हाण, कुटुंब फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व मानवता सेवा चे राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा प्रिया कुष्णा वाघेरा तसेच कुटुंब फाउंडेशन, सल्लागार ज्योती रामदास भगत व मानवता सेवेचे पदाधिकारी यांचा पाठिंबा लाभला.

०००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *