संदीप चव्हाण

पॅरिस : भारतीय कुस्तीसाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एतिहासिक घटना घडली आहे. भारताच्या विनेश फोगटने महिलांच्या ५० मीटर कुस्ती स्पर्धेत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे फोगटचे गोल्ड किंवा सिल्व्हर मेडल नक्की झाले आहे. ज्या आक्रमक पद्धतीने ती खेळत आहे ते पहाता ती गोल्ड मेडलला गवसणी घालणार यात काही शंका नाही. ऑलिम्पिकची फायनल गाठणारी विनेश ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीय.

पन्नास किलो वजनी गटात विनेश पहिल्यांदाच खेळत होती. पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिकमधिल गोल्ड मेडल विजेती युई सुसाकीवर तीने खळबळजनक विजय मिळविला. जागतिक क्रमवारीत युई ही पहिल्या क्रमांकावर आहे यावरून विनेशच्या विजयाचे महत्व लक्षात येईल. त्यानंतर तीने युक्रेनच्या ओकसाना लिव्हाच हीचा गुणांवर पराभव केला. आणि सेमीफायनलमध्ये क्युबाच्या गुजमानला ५-० असे गुणांवर पराभूत करीत पॅरिस ऑलिम्पिकच्या कुस्तीची फायनल गाठलीय.

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ५० किलो वजनी गटात तिने फायनलमध्ये प्रवेश केला. ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन (Yusneylys Guzman) हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

यापुर्वी भारताच्या सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकून दिले होते. विनेशने गोल्ड मेडल जिंकल्यास ती गोल्ड मेडल जिंकणारी पहीली भारतीय कुस्तीपटू ठरणार आहे. शिवाय ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे आजवरचे हे तिसरे गोल्ड मेडल ठरणार आहे. यापुर्वी अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शुटींगमध्ये तर नीरज चोपडाने टोकीयो ऑलिम्पिकमध्य भालाफेकीत भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *