ठाणे:- ठाणे/पालघर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्यापैकी ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष२०२३-२०२४ मध्ये शालांत परीक्षा (इ.१०वी), उच्च माध्यमिक परीक्षा (इ. १२वी) परिक्षेमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होवून शैक्षणिक वर्ष२०२४-२५ मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत व ज्यांचे पाल्य पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापिठात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला आहे, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इ. क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
पात्र माजी सैनिकांनी शिष्यवृत्ती मिळण्याकरिता आपले अर्ज दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे सादर करावेत. अर्ज मिळण्याकरिता माजी ‍सैनिकांनी स्वत:च्या ई-मेल आयडी वरुन या कार्यालयाच्या zswo_thane@maharashtra.gov.in या ई-मेल वर संपर्क करावा, जेणेकरुन त्यांना ईमेलद्वारे अर्ज पाठविण्यात येईल.
तरी अधिक माहितीसाठी ०२२-२५३४३१७४ /९९२००१६५८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे ठाणे/पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *