नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत येणारे नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिम व पूर्व, सेक्टर-2 नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ, सेक्टर – 1 शिरवणे न्यु मॉर्डन बार जवळ, सेक्टर -15 फकिरा मार्केट नेरूळ, सेक्टर-6 सारसोळे, नेरूळ, येथे पदपथावर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच बेवारसपणे वाहन पार्कींग करणाऱ्यांवर संयुक्तरित्या सर्व विभागमार्फंत मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर मोहीमेअंर्तगत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर दि.06 ऑगस्ट 2024 रोजी डॉ. राहुल गेठे, मा. उपआयुक्त(अतिक्रमण), नमुंमपा यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विभाग कार्यालय यांचे मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सामानामध्ये चौदा हातगाडी, तीन शेगड्या, छोटे-मोठे डब्बे, स्टील काउंटर, प्लॉस्टीक स्टुल, पानाची टपरी, गॅस सिलेंडर, छत्री, व्यवसायासाठी वापरत असलेले तीन टेम्पो इत्यादींचा समावेश आहे. जप्त्ा केलेले सामान दि. 06 ऑगस्ट 2024 रोजी कोपरखैरणे क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आलेले आहे.
सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, आठ मजूर, चार टोईंग, दोन पिकअप, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक, नेरुळ स्थानिक पोलीस यांच्या मार्फत करण्यात आली आहे.. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
