मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. गोरेगाव, अँटॉप हिल – वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर – विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून सुरुवात होणार आहे. तर १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येणार असून ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.

घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक दुपारी १२ पासून उपलब्ध राहील. नोंदणीकृत अर्जदारही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत केली जाईल. अर्जाची प्रारूप यादी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत मुदत आहे. लॉटरीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल.

विक्रीस उपल्बध घरे
उत्पन्न गट / घरे
अत्यल्प उत्पन्न / ३५९
अल्प उत्पन्न / ६२७
मध्यम उत्पन्न / ७६८

उच्च उत्पन्न / २७६

लॉटरीत सहभागी होण्याकरिता म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम मोबाइल अॅप उपलब्ध आहे. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच  अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल संकेतस्थळावर आहे.  या लॉटरीत
अत्यल्प उत्पन्न गटसाठी सहा लाखांची उत्पन्ना मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर अल्प उत्पन्न गटसाठी नऊ लाख, ,मध्यम उत्पन्न गटासाठी  बारा लाख
उच्च उत्पन्न गटासाठी बारा लाखांहून अधिक उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *