वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांना नितीन देशपांडे यांचा प्रश्न
अनिल ठाणेकर
ठाणे स्टेशन जवळील गावदेवी मैदाना समोर गेल्या दहा दिवस एक जेसीबी वाहनाच्या चाकातील हवा गेल्यामुळे उभा असून वाहतुकीस अडथळा होत आहे. ठाणे स्टेशनवर जाण्यासाठी वाहनाची दिवसरात्र न भुतो न भविष्यती ये जा करीत असतात . काही वेळेस प्रचंड वाहतूक कोंडीही असते.म्हणूनच हा एक दिशा मार्ग ठेवला आहे.याची कल्पना वाहतूक विभागाला असतानाही सदर बाबतीत ही बाब कायदेशीर कर्तव्यात कसूर नाही का ? असा प्रश्न धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ.. विजयकुमार राठोड यांना विचारला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे असताना त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी वाहतूक विभागाने जी तत्परता वाहतूक वळवण्यासाठी घेतली त्यापेक्षाही अधिक तत्परता वरील सार्वजनिक बाबतीत घेणे हे कायद्याला अपेक्षित असताना आपल्या विभागाचा दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वाहनधारक व पादचारी यांना त्रास होतोय एवढेच नव्हे तर पादचार्यांची सुरक्षिताही धोक्यात आहे याची गंभीर नोंद घ्यावी. सदर बाब म्हणजे ” सरकार हे जनतेचे आहे” असे प्रतिपादन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे नेहमीच करीत असतात याची जाणीव अपणास आहे का ? धर्मराज्य पक्षांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत तत्काळ वरील बाबतीत कार्यवाही करून वाहतुकीचा अडथळा दूर करावा, अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे.
