विनेश फोगट स्पर्धेतून बाद; ऐतिहासिक मेडलही गमावले
संदीप चव्हाण
पॅरिस – भारतीय कुस्ती महासंघावर आकाश कोसळलंय. ऑलिम्पिकमधील कुस्तीचे एतिहासिक गोल्ड मेडल जिंकणाचे स्वप्न अवघ्या भारताला दाखविणाऱ्या विनेश फोगटला फायनलमधूनच बाद करण्यात आले आहे. तिच्या ५० किलो वजनी गटात फायनलआधी तीचे वजन पाचशे ग्रॅमने जास्त भरल्याने नियमानुसार तीला बाद करण्यात आले. खरं तर फायनल गाठल्यामुळे तीचे एक मेडल नक्की होते. पण स्पर्धेतून बाद केल्याने तीला कोणतेच मेडल आता मिळणार नाही.
ऑलिम्पिकच्या इतिहासात फायनल गाठणारी विनेश फोगट ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. यापुर्वी सुशील कुमारने भारताला कुस्तीत ऑलिम्पिकचे सिल्व्हर मेडल जिंकून दिले होते. आज विनेशने गोल्ड अथवा सिल्व्हर कोणतेही मेडल जिंकले असते तरी ते एतिहासिक ठऱले असते. पण स्पर्धेतून बाद झाल्याने सगळ्या स्वप्नांना सुरुंग लागला. विनेशने ज्या क्युबाच्या खेळाडूला सेमी फायनलमध्ये पराभूत केले होते ती आता अमेरिकेच्या खेळाडूविरुध्द फायनल खेळणार आहे.
पन्नास किलो हा वजनी गटात विनेश फोगट पहिल्यांदाच खेळत होती. यापुर्वी तीने दक्षिण कोरीयातील २०१४ सालच्या इंचेनमधिल आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकले होते तर त्यानंतर झालेल्या राष्ट्रकुल स्रर्धेत ५३ किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकले होते. जागतिक स्पर्धेतही तीने ब्राँझ मेडलची कमाई केली होती. खेळाडूने वजनी गट बदलणे तसे कुस्ती, बॉक्सिंगमध्ये नेहमीचेच असते. जागतिक गटातील आव्हान लक्षात घेऊन खेळाडू वजनी गट बदलतात. बॉक्सिंगची स्टार मेरी कोमनेही आपला वजनी गट बदलला होता.
यंदाच्या या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशने जागतिक क्रमावीरत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या आणि विद्यमान टोकीयो ऑलिमपिकमधिल गोल्ड मेडेलिस्ट जपानच्या युई सुसाकीचा पराभव केला होता. युईने आजवर १७ वर्षाखालील पुढील उपलब्ध असणारी सर्व विजेतेपद जिंकली होती. तीही प्रतिस्पर्ध्याला एकही गुण न देता. अशा खेळाडूला पराभूत करून विनेश फायनलला पोहचली होती. पण अखेर काही ग्राम अधिकच्या वजनाने तीचा घात केला.
