दंड भरला तरी मान्यतेची टांगती तलवार कायम.!
राजन चव्हाण

 

सिंधुदुर्ग : तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान महायुतीचं सरकार या दोघांकडून झालेलं दुर्लक्ष आणि नाकर्तेपणामुळंच सिंधुदूर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला १२ लाख रुपये इतका दंड भरावा लागला आहे.
वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन आज तीन वर्ष झाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना अत्यंत घाईगडबडीत हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या वर्षी तर अत्यंत वाईट परिस्थिती होती.मान्यता मिळविण्यासाठी जिल्हा रुंग्णालयाच्या सर्वच इमारतींचा ताबा घेण्यात आला.’लेडीज हॉस्टेल’ व ‘मेस’ दाखवण्यासाठी आवारात असलेल्या डॉक्टरांच्या निवासस्थानाचा ताबा घेण्यात आला.तर ‘बॉईज हॉस्टेल’साठी चक्क    ‘आयटीआय ‘ च्या विद्यार्थ्यांसाठी नव्यानं बांधलेलं हॉस्टेल जबरदस्तीनं ताब्यात घेण्यात आलं.आज जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज ये जा करताना  प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या मुलांना आसपासच्या परिसरात भाड्यानं रहावं लागत आहे.परिणामी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *