ठाणे : वार्षिक उद्योग पाहणी क्षेत्रकामासंबंधी संकल्पना सुस्पष्ट होण्याच्या आणि क्षेत्रकामादरम्यान संकलित केलेल्या आकडेवारीची गुणवत्ता उंचाविण्याच्यानुषंगाने अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय / जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांची तीन दिवसीय निवासी कार्यशाळा दि.०७ते०९ऑगस्ट,२०२४ या कालावधीमध्ये यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्षपद शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक, यशदा यांनी भूषविले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उप महासंचालक, यशदा, पुणे, डॉ. पाणिग्रही, संचालक, औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार, कोलकत्ता, अलोक कुमार, संचालक, क्षेत्रिय कार्यालय, राष्ट्रीय नमूना पाहणी कार्यालय, पुणे, कृष्णा फिरके, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, अमोल खंडारे, सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, दिपाली धावरे, उप संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, इ. वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणातून रोजगार, मूल्यवृद्धी, भांडवल निर्मिती, इ. अर्थव्यवस्थेच्या विविध महत्त्वाच्या निर्देशांकांची माहिती गोळा करण्यात येते व ती राज्याच्या आणि जिल्ह्यांच्या उत्पन्नाच्या अंदाजामध्ये महत्त्वाची ठरते. यासाठी या पाहणीच्या क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांना निवड झालेल्या कारखानदारांनी माहिती देवून देशाची सांख्यिकी व्यवस्था अधिक बळकट करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरके यांनी केले. या कार्यशाळेसाठी जिल्हास्तरावरील व विभागस्तरावरील सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *