राजीव चंदने

 

 

मुरबाड : तालुक्यात आज जागतिक आदिवासी दिन, आदिवासी बांधवानी समाजाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दहा हजारांहून अधिक आदिवासी एकत्र येऊन आपल्या पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन केले. अनेक प्रकारचे नृत्य करून मुरबाड करांचे मन जिंकून घेतले. शिस्तबद्ध रॅली काढून कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी आयोजक व नेमण्यात आलेल्या स्वयंसेवक यांनी घेतली. या रॅलीत आमदार किसन कथोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, शरद पवार गटाचे शैलेश वडनेरे, नगरसेवक रामचंद्र दुधाळे, माजी पंचायत समितीचे सभापती दिपक पवार, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत यांनी सहभाग घेतला. मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद बाबर यांनी खूप चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली होती. रॅलीत सहभागी झालेले सर्व आदिवासीं बांधवानी तहसील कार्यालयाच्या पटागंणात, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, तंट्या भिल, एकलव्य इत्यादींना अभिवादन करून मुरबाडचे नवनिर्वाचित तहसीलदार अभिजित देशमुख यांना अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून आपण निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या मी सरकार पर्यंत पोहचून सर्व मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल व काही मागण्या माझ्या अखत्यारीत आहेत त्या निश्चितपणाने मी येत्या काही दिवसांतच सोडवून देईल असे आश्वासन दिले,या वेळी आदिवासी समाजाचे नेते भगवान भला मा. उपसभापती, किसन गिरा, नंदा उघडा, गोविंद भला,पं. स. उपसभापती अरुणा खाकर,जया वाख, आदिवासी क्रांती सेना अध्यक्ष,दिनेश जाधव, आदिवासी समाज संघटना अध्यक्ष, रघुनाथ खाकर,अनिल कवटे, पंकज वाघ, मारुती वाघ, तालुक्यातील सर्व आदिवासी सरपंच, उपसरपंच, सदस्य इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *