दरेकर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी
मातोश्रीवर, सिल्व्हर ओकवर फिल्डींग लागायची
स्वाती घोसाळकर
मुंबई : विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव बाळासाहेब
ठाकरे शिवसेना आणि शऱदचंद्र पवारांची राष्ट्रवादीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपापाठोपाठ आता आरोपांच्या ‘परमवीर अस्त्रा’चा मारा सुरु केला आहे. अनिल देशमुख यांनी शंभर कोटी वसुली केल्याच्या आरोपाचा पुर्नउच्चार करतानाच परमवीर सिंग यांनी थेट मातोश्री आणि सिल्वर ओकचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तत्कालीन विरोधी नेत्यांमधील प्रवीण दरेकर यांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, तर गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी सिल्वर ओकवर बैठक झाली होती असा सनसनाटी आरोपही परमबीरिसिंग यांनी केला.
गुन्हे दाखल करून वसुलीत भ्रष्टाचार करणारे खरे सूत्रधार अनिल देशमुख असले, तरी त्यांच्या मागे पवार–ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंह केला. परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हॉटेल ललितमध्ये बसून डील करत होते, असा आरोप केला. ते म्हणाले की पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख यांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव आला होता असा सुद्धा आरोप परमवीर सिंह यांनी केला. जयकुमार रावल यांनाही अडकवण्यासाठी बैठक घेण्यात आलाचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे. देशमुख सातत्याने वसुलीचे टार्गेट आहे असे सांगत होते असेही परमवीर सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान देशमुख यांचा आपण आदर करतो. सलील देशमुख यांनी माझ्याबद्दल वापरलेल्या भाषेबद्दल किव येत असल्याचे म्हटले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे त्यांनी सांगितले. मी कधी आजपर्यंत अशा भाषेचा वापर केलेला नाही किंवा कोणत्याही माध्यमांसमोर येऊन या प्रकरणांमध्ये व्यक्त झालेलो नाही. मात्र माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी यासंदर्भात बोलत असल्याचे परमवीर सिंह यांनी सांगितले.
