उल्हासनगर : मुंबई येथील नार्कोटेक्स ब्युरोने आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेट चा पर्दाफाश केला असुन यांच्या कडुन ७५ किलो गांजासह ४८०० कोडीन सिरीप च्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी सहा जणाना अटक केली असुन एक जण उल्हासनगर चा आहे.
उल्हासनगर कॅंप ३ येथील एका इमारती मध्ये आंतरराज्य ड्रग्ज सिंडिगेट च्या माध्यमातुन ड्रग्ज पुरवण्याचे काम होत असल्याची माहीती नार्कोटेक्स ब्युरो चे प्रमुख अमित चौडी यांना मिळाली तेव्हा त्यांनी ८ ऑगस्ट पासुन कॅंप ३ येथील एका कुरियर च्या कार्यालयावर पाळत ठेवली. दरम्यान ९ ऑगष्ट रोजी त्या ठिकाणी ४८०० कोडीन सिरप च्या बाटल्या उतरवन्यात आल्या.तेव्हा नार्कोटेक्स ब्युरोचे प्रमुख यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता बाटल्या मिळुन आल्या आहेत. तेव्हा या प्रकरणी उल्हासनगर येथुन विनोद नावाच्या इसमाला अटक केली असुन त्याच्या माहीतीवरुन भिवंडी येथुन एक कार ताब्यात घेण्यात आली आहे. त्या कार मध्ये ७५ किलो गांजासह १ लाख १८ हजार रुपये आणि प्रवाशी बॅग सोबतच ट्रॉली बॅग मिळुन आले आहे. या प्रकरणी आकाश पी , अंकुश पी , मनोज सह इतर तीन जण यांना नार्कोटेक्स ब्युरोने अटक केली आहे.या सर्व आरोपीवर एनडीपी कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
