जगातील संपूर्ण युवकांनी घातक क्षेपणास्त्रे,जैविक हतीयार, प्लास्टिकचा अती वापर,वाढते धुम्रपान व वाढते प्रदुषण याचा कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने १७ डिसेंबर १९९९ ला युवा विश्र्व संम्मेलनाच्या कार्यक्रमात ठरविण्यात आले की प्रत्येक वर्षाच्या “१२ ऑगष्टला” युवा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.याप्रमाने पहिल्यांदाच २००० मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांची सुरूवात करण्यात आली. २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांचा थीम होता “युवाओं के लिये सुरक्षित स्थान” आणि २०१९ मध्ये थीम होता “ट्रांस्फोर्मिंग एज्युकेशन” परंतु २०२४ चा थीम “पृथ्वी को बचाने का प्रयास”.हा थीम असायला पाहिजे असे माझे मत आहे.कारण वैश्विक महामारी आणि पृथ्वीचा होत असलेला ह्रार याला युवा शक्तीच वाचवु शकते. संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.कारण आजच्या परिस्थितीत पृथ्वीतलावर “जगात युध्दजन्य परीस्थितीत दीसुन येते.आज प्रत्येक देश एक-मेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन-रशिया युद्ध, इजरायल-हमास-इरान संघर्ष व तैवान-चीन कटुता यात प्रगती तर नाहीच परंतु विनाश अटळ आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिंपिंग यांनी वुहानमध्ये कोरोणा व्हायरस तयार केला आणि याला संपूर्ण जगात पसरविण्याचे काम सुध्दा चीनने केले.यात लाखोंच्या संख्येने जिवीत हानी सुध्दा झाली व करोडोंच्या संख्येने संक्रमीत झाले होते. अमेरीकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ६ ऑगस्ट १९४५ साली सकाळी ८ वाजुन १५ मि. हिरोशिमा-नागासाकीवर परमाणु बॉम्ब टाकला होता याचे मुख्य कारण तानाशहा हिटलर यांची क्रूरता समाप्त करने होती.परंतु याचे प्रायचीत्य संपूर्ण जापानला भोगावे लागले.यात लाखोंची जीवीत हानीसुध्दा झाली.दिनांक ६ ऑगस्ट या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली. परंतु चीनच्या विस्तारवादी नितीला रोखण्यासाठी अमेरीकेसह नाटोसेनेने चायना सी मध्ये चिनला घेरून ठेवले आहे.सोबतच चीन तैवानला नेहमीच युध्दासाठी उकसवीण्याचे काम करीत असतो. परंतु आता जर युद्ध झाले तर “तिसरे महायुध्द” अटळ आहे.कारण सध्याच्या परिस्थितीत रशिया-युक्रेन, अमेरीका – नाटो-चीन,इजरायल-हमास-इराण एकमेकांचे कट्टर दुष्मण झाले असून कोण केव्हा कोणावर महाविणाशक प्रहार करेल हे सांगता येत नाही व यामुळे अनर्थ केव्हाही उद्भवू शकतो याला नाकारता येत नाही.याला युवावर्गानी कोठेतरी रोखले पाहिजे. कारण चीनने सुपरपावर बनण्यासाठी संपूर्ण हद्द पार केलेल्या आहेत.जगातील कोणत्याही देशाचा युवक असो त्याने पशु-पक्षी व मनुष्य प्राणी यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पध्दतीचे कार्य अंगीकारले पाहिजे.याकरीता चीनच्या युवकांनी शि.जिंनपिंग यांच्या विनाशकारी बायोवेपन्सचा कडाडून विरोध करून चांगला धडा शिकवला पाहिजे.आज संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे. मानवजातीचा पृथ्वीतलावर जन्म जनकल्याणासाठी व विकासासाठी झाला आहे.त्यामुळे आजच्या युवकांनी जगाला कोणत्याही परीस्थितीत विनाशापासुन रोखलेच पाहिजे. अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही. जर्मनीचा तानाशहा हिटलर यांची कल्पना “विस्तारवादाची” होती.परंतु त्याचे प्रायचित्य “हिरोशिमा-नागासाकीच्या” स्वरूपात “जापानला”भोगावे लागले. याची पुनरावृत्ती चीन व चीनच्या मित्रराष्ट्रामध्ये होवु शकते याला नाकारता येणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिनपिंग त्याचे विस्तारवादाचे प्रायचीत्य चीनला व त्यांच्या मित्रराष्ट्रांना भोगावे लागेल.त्यामुळे जगातील युवकांनी या युध्दजन्य परीस्थितीला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आवाज उठवीण्याची गरज आहे. करोना काळाच्या कठीण प्रसंगात अनेकांची घरे उजाडली, उपासमारी,भुकमरी, बेरोजगारी, महागाई अशा कठीण प्रसंगांना युवकांना व सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागले होते.आजचा युवावर्ग शारिरीक दृष्ट्या कमजोर असला तरी “बुध्दीच्या” बाबतीत तर्बेज आणि ताकदवर आहे.त्यामुळे आज कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी बुध्दीचा योग्य वापर करण्याची वेळ युवकांवर आली आहे.कारण युवाशक्ती “भविष्याची पुंजी” आहे.याची जोपासना करण्याचे काम अनुभवी पीढीने युवकांना मदत करून केले पाहिजे. आज संपूर्ण जगात निसर्गाचा ह्रास मोठ्या प्रमाणात होत असल्याने मानवजाती व संपूर्ण जीवजंतू भयभीत आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक देशांनी आपल्या वर्चस्वासाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळा, घातक क्षेपणास्त्रे व परमाणु बॉम्ब बनवीले आहे.म्हणजेच आज संपूर्ण पृथ्वी “बारुदच्या ढीगाऱ्यावर” बसली आहे. त्यामुळे प्रत्येक देश विनाशाकडे वाटचाल करतांना दिसत आहे.परंतु विध्वंसकारी व विनाशकारी प्रवृत्तीला युवावर्ग रोखु शकते. प्रत्येक देशाच्या युवकांनी शांतीचा मार्ग स्वीकारण्याचे ठाणले तर प्रत्येक देशाचे राष्ट्राध्यक्ष व राजकीय पुढारी युवकांच्या मार्गाला चालना देवु शकते.आपण हिरोशिमा- नागासिकाचा विनाश पहाला, ४ऑगष्ट २०२० ला “लेबनॉनची राजधानी बेरुत”त्यांची पुनरावृत्ती आपण पहाली हा धमाका हिरोशिमा-नागासिकापेक्षा भयानक असल्याचे सांगण्यात येते, युक्रेन -रशिया युध्दामुळे युक्रेन १०० वर्षे मागे गेला आहे, पाकिस्तान आतंकवाद्यांनी भरभटला आहे, बांगलादेश हिंसाचाराने जळत आहे,चीन-तैवानमध्ये युध्दाची ठीणगी केव्हाही उडु शकते, इजरायल -हमास-इराण संघर्ष तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप केव्हाही घेवू शकते.म्हणजेच कोणताही दारूगोळा असो त्याचा फक्त एकच मार्ग असतो तो म्हणजे “विनाश” यात सर्वच भरडल्या जाते मग तो कितीही मोठा बलाढ्य देश असो.त्यामुळे जागतिक विनाशाला युवकांनी कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होवु शकतो याला नाकारता येत नाही. सध्याच्या परीस्थितीत युवा शक्ती ही “जगासाठी मोठी पुंजी” आहे. त्यामुळे सर्वांनीच युवकांना सहकार्य करून जी काही जगात विनाशकारी लीला सुरू आहे तीला ताबडतोब रोखण्याची नीतांत गरज आहे.हे कार्य युवकांच्या शक्तीनेच सफल होवु शकते.युवावर्ग सर्वच क्षेत्रात आमूलाग्र प्रगती करीत आहे यात दुमत नाही.परंतु शि.जिनपिंग व उत्तर कोरियाचा तानाशहा कींग्म जॉन उन सारखे जगाला विनाशाकडे नेत आहे.यांच्यावर नियंत्रण लावने अती आवश्यक आहे. संपूर्ण जगातील युवावर्ग, शिक्षणामध्ये व खेळांमध्ये अग्रेसर आहेत. भारतातील युवावर्ग राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळांमध्ये अग्रगण्य भुमिका बजावुन देशाची मान उंचावून सन्मानजनक स्थितीमध्ये आहे.याचे संपूर्ण श्रेय युवकांना जाते. देशाचा युवा म्हणजे भारताची आन-बाण-शान आहे. आंतराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवकांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष देवून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प केला पाहिजे.कारण पृथ्वीला टीकवुन ठेवायचे असेल तर निसर्ग आवश्यक आहे.याकरीता वृक्षलागवड सर्वात मोठा रामबाण उपाय आहे.यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थीर रहाण्यास मोठी मदत होईल.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *