अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेस अद्याप सुरुवातही झालेली नाही तोवर भाजपासमर्थक आमदार रवी राणां यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना धमकी देऊन टाकलीय. मला मत नाही दिले तर दिलेले पैसे काढून घेईन अशी धमकीच रवी राणां यांनी दिलीय.

अमरावती येथे आज आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच ३००० करु, तर आता यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून १५,०० रुपये वापस घेणार, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.

आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  दरम्यान, ही योजना फक्त निवडणुकीसाठी असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार या योजनेचे पैसे मिळणारच असं सांगत आहेत. योजना सुरूच राहीलं असंही सांगत आहेत, दरम्यान, आता आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *