ठाणे, सत्ताधारी राड्याचा समर्थन करतात.माझा प्रश्न ठाणेकरांना आहे. या ठाण्याची संस्कृती राड्याची नाही, ती तुम्ही राडेबाज लोकांच्या हातात देणार आहात का? या ठाण्याचा उत्तर प्रदेश, बिहार करण्याचा प्रयत्न जे राजकारणी करतायेत त्यांच्या बाजूने सर्वसामान्य सुशिक्षित ठाणेकर उभे राहणार आहेत का? आज ते दुसऱ्यांच्या गाडीच्या काचा फोडतायेत उद्या ते सर्वसामान्य नागरिकांच्या गाडीच्या काचा फोडायला मागेपुढे बघणार नाहीत… लोकशाहीत असली झुंडशाही ठाणेकर मान्य करणार आहेत काय? तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा… तुम्ही कोणालाही फॉलो करा.. मात्र जे लोक या ठाण्याचं नाव खराब करतायेत, त्यांच्या बाजूने उभे राहू नका असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केले आहे.
नुकताच ठाण्यात जो प्रकार येथील सुपारी बाज लोकांनी घडवून आणला आणि त्याला सत्तेतील लोकांनी जे समर्थन दिल त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. या ठाण्यावर बाळासाहेबांनी जीवापाड प्रेम केलं.त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचे धाडस येथील काही समाजकंटकाने केलं त्याचं समर्थन राज्याचे मुख्यमंत्री करतात इतकी वाईट परिस्थिती या राज्यामध्ये याआधी कधी नव्हती.मुख्यमंत्री कोणत्याही स्थितीत ठाकरे कुटुंब, बाळासाहेबांचा कौटुंबिक राजकीय वारसा संपवायला निघालेले आहेत. ते सांगतात की मी हिंदुत्ववादी आहे. मुळात ते भाजप वादी आहेत. ते भाजप वादी असल्यानेच बाळासाहेब आणि त्यांचा राजकीय वारसा संपवायला निघालेत की काय? असा प्रश्न मला पडतो.अतिशय घाणेरड्या पद्धतीचा राजकारण मागच्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं अशी खोटी बोंब उटवून 100 वेळा खोटं बोलून ते लोकांना सत्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव आहे या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याने याआधी अशा पद्धतीची भाषा कधीच वापरली नव्हती. शिंदे स्वतःला कर्मयोगी म्हणून घेतात.त्यांनी कोणतं कर्म या ठाण्यामध्ये केल आहे. या ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे का? या ठाण्यातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्याचं कर्म त्यांच्या हातून झाल आहे का?या ठाण्यातील सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळवून देण्याचं कर्म त्यांच्या हातून झाला आहे का? या ठाण्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांगले आरोग्य यंत्रणा उभारण्याचं कर्म इतक्या वर्षात त्यांच्या हातून झालं का ?ठाणे महापालिका गेली 20 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे ती चांगल्या पद्धतीने चालवण्याचा कर्म त्यांच्या हातून झाला आहे का? फार विचित्र पद्धतीची ही माणस आहेत. ठाण्यात परमवीर सिंग आयुक्त होते. त्यांचे आणि शिंदे यांचे संबंध चांगले होते. हेच सिंग मुख्यमंत्री शिंदेंना उद्धव ठाकरे अडकवायला बघत होते असा आरोप करतात…अरे कुणाला विश्वास बसेल? परमवीर सिंग आणि एकनाथ शिंदेंचे संबंध चांगले होते. त्यांनीच त्यांना मुंबईमध्ये पोलीस आयुक्त करण्यासाठी घेऊन गेले असं म्हणतात.आणि आता उद्धव साहेबांवरती आरोप करण्यासाठी अजून खालच्या थरावर शिंदे जात आहेत… भाजपच्या दावणीला बांधून दिल्लीसमोर लोटांगण घालण्याचा विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहे ते उद्धव साहेबांना पाण्यात बघण्याचा कार्यक्रम करत आहेत.ही भरकटलेली माणस आहेत.ठाणे शहराला ठाणे जिल्ह्याला एका सांस्कृतिक उंचीचा वारसा आहे. तो वारसा खतम करण्याचं काम यांच्या राजवटीत सुरू आहे. सुशिक्षित ठाणेकर म्हणून आणि शिकलेले नागरिक म्हणून आपण या अशा प्रवृत्तीच्या लोकांना जर साथ दिली तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत हे ठाणेकरांनी लक्षात घ्यावे असे मत संजय घाडीगांवकर यांनी व्यक्त केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *