माजी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांचे ठाण्यात प्रतिपादन

 

 

ठाणे : मुलाखतीत उमेदवाराचे ज्ञान अजिबात तपासले जात नाही, तर आत्मविश्वास पाहिला जातो. युपीएससी, एमपीएससी हे सर्व्हीस सिलेक्शन नव्हे तर ते सर्व्हिस रिजेक्शन बोर्ड आहे. एमपीसएसी, युपीएससीच्या तयारी करताना प्लॅन बी तयार पाहिजे. स्पर्धा परिक्षा हे अग्निपथ आहे, असा मोलाचा सल्ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य व माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रविवारी ठाण्यात दिला.
रिलायबल अकॅडमीच्यावतीने रविवारी गडकरी रंगायतन येथे स्पर्धा परीक्षा संमेलनाचे आयोजन केले होते. युपीएससी आणि एमपीएससीमध्ये १९३७ पासून जितके बदल झाले नाही तितके मी आणि आमच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांनी दोन वर्षांत केले. या बदलत्या निर्णयांमुळे २०२६-२०२७ मध्ये महाराष्ट्रातील २५० मुले युपीएससीमध्ये निवडले जातील ही खात्री आहे. हे सांगताना दिघावकर पुढे म्हणाले की, चांगला माणूस हा चांगला अधिकारी होऊ शकतो. आज एक दोन ठिकाणी छापे टाकले की अधिकारी ताबडतोब सिंघम होतात. पण तुमचे माणूस म्हणून काय योगदान हे महत्त्वाचे आहे.
राज्य राखीव पोलीस बल, नवी मुंबईच्या समादेशक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, स्पर्धा परिक्षेची तयारी करताना मानसीक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना प्लॅन बी देखील तयार ठेवा. हातचं सुटलं अशी परिस्थिती व्हायला नको.
केंद्रीय लोकसेवा आयोगचे माजी अध्यक्ष डीपी अग्रवाल यांनी भारतातील नागरी सेवा परीक्षा व त्यात झालेले काळानुरूप बदल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पत्रकार सौरभ द्विवेदी, रिलायबल अकॅडमीचे संचालक मनोहर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा रिलायबल अकॅडमीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सात वर्षांची तपश्चर्या
गेल्या सात वर्षांपासून रिलायबल अकॅडमीच्या माध्यमातून हे स्पर्धा परीक्षांचे संमेलन आयोजित करण्यात येते. याठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध केली जातात. हा एक प्रकारे मदतयज्ञ असून भविष्यात यापेक्षा मोठ्या पातळीवर संमेलन आयोजित करण्याचा रिलायबल अकॅडमीचा मानस असल्याचे संचालक मनोहर पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *