नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये सद्यस्थितीत पावसाची येजा सुरु असल्याने हिवताप /डेंग्यु, जललन्य व साथरोग या आजारांसाठी संवेदनशील आहे. त्याअनुषंगाने नमुंमपा, आरोग्य विभागमार्फत हिवताप /डेंग्यु यासारखे आजाराचा प्रसार रोखणे करीता संपुर्ण नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रत्यक्ष सर्वेक्षण, नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण, घरांतर्गत डासउत्पत्ती शोध मोहिमे नियमित स्वरुपात सुरु आहेत. याव्यतीरीक्त नमुंमपा मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
3 मे व ५ ऑगस्टला विशेष शिबीरांचे आयोजन केले असता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्याअनुषंगाने कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहचुन जणजागृती करणे करीता १२ ऑगस्टला श्रावणी सोमवारचे औचित्य साधुन 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरीता 7856 नागरीकांनी भेट दिली असुन, 1070 रक्त नमुने घेण्यात आले.
सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणून ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवुन, तसेच नागरीकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवुन ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंधिस्त करणे, त्याबरोबर पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंधिस्त करणे व आठवड्यातुन एक दिवस स्वच्छ करुन कोरडे ठेवणे / भंगार साहित्य टायर्स इत्यादी नष्ट करणे / छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचु देवु नये व ताप येताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे या बाबत नागरीकांना प्रोत्साहित करुन, सदर बाबतीत आवाहन करण्यात आले.
तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाही सोबतच नवी मुंबईच्या नागरीकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट केली तरच नवी मुंबईत प्रभावीपणे हिवताप / डेंग्यु रुग्ण संख्या कमी करणेस मदत होईल. असे आवाहन मा. आयुक्त, डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.
0000
