डोंबिवली : गोविंदानंद सरस्वती न्यास (हर्डी -राजापूर, रत्नागिरी ) संचालित श्रीमदभगवदगीता पठण समिती डोंबिवली (विश्वस्त -विश्वास वामन नवरे ) या न्यासातर्फे घेण्यात आलेल्या श्रीमदभगवदगीतेच्या 18 व्या अध्यायातील श्लोक पाठांतर स्पर्धेत लोकसेवा समिती डोंबिवलीच्या कार्यकर्त्यां सौ. माधवी जगदीश घाग यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा जगद्गुरू शंकराचार्य यांच्या शिष्यगणांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक उडपी शृंगेरी येथे घेतली गेली होती. या न्यासातर्फे एकूण 5 महिलांनी भाग घेतला होता.
00000
