न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते रविवारी होणार गौरव

 

 

 

ठाणे : जन्मभूमी पेक्षा कर्मभूमीच श्रेष्ठ मानून ज्यांनी शाळेची जवळपास तीन ते चार दशके निरलसपणे सेवा केली अशा शिक्षण सेवेचे व्रत अंगीकारलेल्या  सेवाव्रती  उषा मुकुंद केळकर (वय 95) आणि गणेश हरी उपाख्य बलुकाका पेंडसे ( वय  91) या दोघांचा अभीष्टचिंतन सोहळा मो.ह. विद्यालयाच्या प्रांगणात 18 ऑगस्ट रोजी दुपारी  ४ वाजता संपन्न होणार आहे. न्यायिक क्षेत्रातील मूल्य जपणारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आपल्या गुरुजनांसाठीच या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद भूषवणार आहेत.
उषाताई केळकर संगीताच्या उत्तम शिक्षिका तर बलूकाका पेंडसे सर शारीरिक शिक्षणाचे लाडके शिक्षक. संपूर्ण शाळा हे एक कुटुंबच आहे असे मानून मो.ह. परिवारातल्या प्रत्येकाला एका प्रेमळ धाग्याने अखंड बांधून ठेवण्याचं अजोड काम या दोहोंनी केले. निवृत्त होऊनही जवळपास तीन दशके लोटली तरीही शाळेबद्दल, संस्थेबद्दलचे त्यांचे प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही. शाळेत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला हजर राहून कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत असतात. आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे जणू हे दोघे अक्षय पात्र आहेत. संस्कारांची पाठ राखण करणाऱ्या मो.ह. परिवाराला यांचा अत्यंत अभिमान आणि कौतुक आहे म्हणूनच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *